मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

विल्यमसनसह 6 विकेट्स घेणाऱ्या बॉलरची इंग्लंड करणार हकालपट्टी, जाणून घ्या कारण

विल्यमसनसह 6 विकेट्स घेणाऱ्या बॉलरची इंग्लंड करणार हकालपट्टी, जाणून घ्या कारण

न्यूझीलंड विरुद्ध लॉर्ड्सवर सुरु असलेल्या टेस्टमध्ये इंग्लंडचा फास्ट बॉलर ओली रॉबिन्सन (Ollie Robinson) याने बॅटींग आणि बॉलिंगमध्ये दमदार कामगिरी केली आहे. या कामगिरीनंतरही त्याची टीममधील जागा धोक्यात आहे.

  • Published by:  News18 Desk
लंडन, 6 जून : न्यूझीलंडच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची (WTC Final 2021) तयारीला इंग्लंडच्या नवोदीत बॉलरनं धक्का दिला आहे. लॉर्ड्समध्ये सुरु असलेल्या टेस्टमध्ये ओली रॉबिन्सन (Ollie Robinson) याने या मर्यादा उघड केल्या आहेत. विशेष म्हणजे रॉबिन्सनची ही पहिलीच टेस्ट आहे. रॉबिन्सननं या मॅचमध्ये बॅट आणि बॉल या दोन्हीमध्ये कमाल केली आहे. रॉबिन्सनची कमाल न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये रॉबिन्सननं 75 रन देत 4 विकेट्स घेतल्या. तसंच 42 रन काढले. रॉबिनसननं पहिल्या इनिंगमध्ये टॉम लॅथम, रॉस टेलर, कॉलिन डी ग्रँडहोम आणि काइल जेमीसन यांना आऊट केले. त्यानंतर त्याने दुसऱ्या इनिंमध्येही जोरदार बॉलिंग करत न्यूझीलंडच्या बॉलर्सना त्रस्त केले. पहिल्या इनिंगमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या डेवॉन कॉनवेला (Devon Conway) रॉबिनसननं लवकर आऊट केलं. त्यापाठोपाठ कॅप्टन केन विल्यमसनला आऊट करत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. टीममधील जागा धोक्यात या चांगल्या कामगिरीनंतरही त्याची टीममधील जागा धोक्यात आली आहे. रॉबिन्सननं 8 वर्षांपूर्वी केलेल्या ट्विटमुळे त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. त्याने आठ वर्षांपूर्वी वर्णद्वेषी आणि लिंगभेदी ट्विट केले होते. यामुळे त्याच्यावर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) कारवाई करण्याची शक्यता आहे. रॉबिन्सनला दुसऱ्या टेस्टमधून वगळले जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर त्याला आर्थिक दंडही आकारला जाऊ शकतो. ECB ने घेतला धडा रॉबिन्सन प्रकरणानंतर इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने (ECB) धडा घेतला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) मात्र आता टीममध्ये निवड होण्यासाठीचे निकष बदलले आहेत. फिटनेसबरोबरच आता खेळाडूंच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही लक्ष दिलं जाणार आहे. राष्ट्रीय टीममध्ये निवड होण्याआधी बोर्ड खेळाडूचा सोशल मीडियावरचा इतिहासही पाहण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य इंग्लंडचे साहय्यक प्रशिक्षक ग्रॅहम थोर्पे (Graham Thorpe) याने केले आहे. संजय मांजरेकरने नोंदवला अश्विनबद्दल आक्षेप, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केली बोलती बंद! रॉबिन्सनं मागितली माफी लॉर्ड्स टेस्टचा पहिला दिवस संपल्यानंतर रॉबिन्सनने लगेचच या प्रकरणी माफी मागितली. 'माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या दिवशी मी 8 वर्षांपूर्वी केलेल्या वर्णभेदी आणि लिंगभेदी ट्वीटबाबत मला लाज वाटत आहे. मी वर्णभेदी किंवा लिंगभेदी नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो. 8 वर्षांपूर्वी केलेल्या या कृतीचा मला पश्चाताप झाला आहे. तसंच यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागतो. मी कोणताही विचार न करता, बेजबाबदारपणे वर्तणूक केली. या गोष्टी समजण्याइतकं माझं वयही तेव्हा नव्हतं. तरीही मी माफी मागतो,' असं रॉबिन्सन म्हणाला.
First published:

Tags: Cricket, England, New zealand

पुढील बातम्या