मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

WTC Final : केन विल्यमसनची चिंता वाढली, टीम इंडिया उठवणार फायदा!

WTC Final : केन विल्यमसनची चिंता वाढली, टीम इंडिया उठवणार फायदा!

लॉर्ड्समध्ये इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या टेस्ट मॅचमध्ये न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) याची चिंता वाढली असून त्याचा फायदा टीम इंडियाला (Team India) होणार आहे.

  • Published by:  News18 Desk
लंडन, 6 जून : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलला (WTC Final 2021) आता दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. या फायनलसाठी टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. तर, न्यूझीलंडची इंग्लंड विरुद्ध टेस्ट मॅच खेळत आहे.लॉर्ड्समध्ये सुरु असलेल्या या टेस्ट मॅचमध्ये न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) याची चिंता वाढली असून त्याचा फायदा टीम इंडियाला होणार आहे. लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडची टीम 378 रन काढून ऑल आऊट झाली. डेवॉन कॉनवे (Devon Conway) याचे द्विशतक हे न्यूझीलंडच्या इनिंगचं वैशिष्ट्य होते. त्याने पदार्पणातच द्विशतक झळकावण्याची कामगिरी केली. त्याला उत्तर देताना इंग्लंडची टीम 275 रनवरच ऑल आऊट झाली. पहिल्या इनिंगमध्ये 103 रनची आघाडी घेणाऱ्या न्यूझीलंडची दुसऱ्या इनिंगमध्ये सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या इनिंगचा हिरो डेवॉन कॉनवे 23 रन काढून आऊट झाला. त्यानंतर मैदानात आलेला कॅप्टन विल्यमसन पुन्हा एकदा अपयशी ठरला. दोन्ही इनिंगमध्ये विल्यमसन फेल टेस्ट रँकिंगमध्ये सध्या नंबर 1 वर असलेला केन विल्यमसन लॉर्ड्स टेस्टमधील दोन्ही इनिंगमध्ये फेल गेला आहे. तो पहिल्या इनिंगमध्ये 13 रन काढून आऊट झाला होता. तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याला फक्त 1 रन काढता आला. इंग्लंडकडून या टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या ओली रॉबिन्सन (Ollie Robinson) याने त्याला दुसऱ्या इनिंगमध्ये आऊट केले. आठ वर्षांपूर्वी केलेल्या ट्विटमुळे रॉबिन्सनचं पदार्पण वादग्रस्त ठरलं. पण या तरुण बॉलरनं पहिल्याच मॅचमध्ये प्रभावी बॉलिंग करत सर्वांना प्रभावित केले आहे. भलतंच काहीतरी! इंग्लंडच्या टीममध्ये निवड होण्यासाठी आता हा नियम रॉबिन्सननं शनिवारी विल्यमसनला वारंवार चकवले. त्याने 25 ओव्हरमध्ये सलग दोन बॉलवर त्याला आऊट केले. यापैकी पहिल्या वेळी तो DRS मुळे वाचला. पण त्यानंतरच्या पुढच्याच बॉलवर विल्यमसनविरुद्ध जोरदार अपील झाले. अंपायरने त्याला आऊट दिले नव्हते.पण, इंग्लंडचा कॅप्टन जो रुट (Joe Root) याने DRS घेतला, आणि विल्यमसन आऊट असल्याचे स्पष्ट झाले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी विल्यमसनचा हा फॉर्म न्यूझीलंड टीमच्या चिंतेचा विषय आहे. तर या मॅचवर बारीक लक्ष ठेवून असलेली टीम इंडिया याचा फायदा उठवणार आहे.
First published:

Tags: Cricket, New zealand, Team india

पुढील बातम्या