Home /News /sport /

ENG vs NZ : 'हे भारतात घडले असते तर...' फास्ट बॉलरनं साधला लॉर्ड्सवर निशाणा

ENG vs NZ : 'हे भारतात घडले असते तर...' फास्ट बॉलरनं साधला लॉर्ड्सवर निशाणा

इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यात लॉर्ड्सवर सुरू असलेल्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी बॉलर्सचा दबदबा होता. या टेस्टच्या पहिल्याच दिवशी 17 विकेट्स पडल्या.

    मुंबई, 3 जून : इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यात लॉर्ड्सवर सुरू असलेल्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी बॉलर्सचा दबदबा होता. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्यासाठी उतरलेली न्यूझीलंडची टीम फक्त 132 रन काढून आऊट झाली. त्याला उत्तर देताना इंग्लंडची पहिल्या दिवसाच्या अखेरीस 7 आऊट 116 अशी अवस्था आहे. लॉर्ड्सच्या पिचवर पहिल्याच दिवशी 17 विकेट्स पडल्यानंतर टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर डोडा गणेशनं (Dodda Ganesh) टीका केली आहे. भारतीय पिचवर एकाच दिवशी 17 विकेट्स पडल्या असत्या तर गोंधळ झाला असता, पिचबद्दल प्रश्न विचारले असते. पण, हे लॉर्ड्सवर झालं असल्यानं कुणीही प्रश्न विचारणार नाही.' असा टोला गणेशनं लगावला आहे. लॉर्ड्सवर सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर त्यांचा फक्त 132 रनवर ऑल आऊट झाला. जेम्स अंडरसन आणि मॅटी पॉट्स यांना प्रत्येकी 4-4 विकेट मिळाल्या. तर स्टुअर्ट ब्रॉड आणि बेन स्टोक्सला 1-1 विकेट घेण्यात यश आलं. न्यूझीलंडकडून कॉलिन डि ग्रॅण्डहोमने सर्वाधिक 42 रन केले. ऋद्धीमान साहानं 15 वर्षांनी सोडली टीमची साथ, भावुक होत सांगितलं निर्णयाचं कारण  या छोट्या स्कोरला उत्तर देताना इंग्लंडनं पहिल्या दिवसाच्या अखेरीस 116 रन केले असले तरी त्यांनी 7 विकेट्स गमावल्या आहेत. इंग्लंडकडून अ‍ॅलेक्स लीस (25) आणि जॅक क्रॉली (43) यांनी चांगली सुरूवात केली. या दोघांनी पहिल्या विकेट्ससाठी 59 रनची भागिदारी केली. ही जोडी फुटल्यानंतर इंग्लंडच्या इनिंगला खिंडार पडले. . जो रूट 11 तर नवा कॅप्टन बेन स्टोक्स फक्त 1 रनवर आऊट झाला. त्यापाठोपाठ जॉनी बेअरस्टो आणि मॅथ्यू पोट्स आऊट झाल्यानं इंग्लंडची पहिल्या इनिंगमध्ये 7 आऊट 100 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर बेन फोक्स आणि स्टुअर्ट ब्रॉडनं दिवसअखेरपर्यंत किल्ला लढवत आणखी पडझड होऊ दिली नाही.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Cricket news, England, New zealand

    पुढील बातम्या