Home /News /sport /

WTC Final : न्यूझीलंडच्या अनुभवी बॅट्समननं विराटला टाकलं मागं, टीम इंडियाला इशारा

WTC Final : न्यूझीलंडच्या अनुभवी बॅट्समननं विराटला टाकलं मागं, टीम इंडियाला इशारा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी (WTC Final 2021) न्यूझीलंडचा अनुभवी बॅट्समन फॉर्मात आला आहे. टीम इंडियासाठी हा धोक्याचा इशारा आहे.

    लंडन, 13 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी (WTC Final 2021) न्यूझीलंडचा अनुभवी बॅट्समन फॉर्मात आला आहे. टीम इंडियासाठी हा धोक्याचा इशारा आहे. इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये रॉस टेलरनं (Ro ss Taylor) 80 रनची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडनं 388 पर्यंत मजल मारली. टेलरनं या खेळीच्या दरम्यान 7500 रनचा टप्पा पार केला. त्याचबरोबर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि वेस्ट इंडिजचा दिग्गज बॅट्समन डेसमंड हेन्स यांना मागे टाकले. टेलरनं आजवर 107 टेस्टमध्ये 45.76 च्या सरासरीनं 7506 रन काढले आहेत. 290 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. न्यूझीलंडच्या या बॅट्समननं टेस्ट क्रिकेटमध्ये 19 शतक आणि 35 अर्धशतक झळकावली आहेत. तर विराट कोहलीनं 91 टेस्टमध्ये 52.37 च्या सरासरीनं 7490 रन केले आहेत. टेलर फॉर्मात परतला रॉस टेलरनं मागील 16 टेस्टमध्ये फक्त दोन अर्धशतक झळकाले आहेत. फायनलपूर्वी इंग्लंड विरुद्धची टेस्ट त्याच्यासाठी फायदेशीर ठरली आहे. न्यूझीलंडच्या सध्याच्या टीममधील बॅट्समनचा विचार केला तर टेलरनं सर्वात जास्त 812 रन भारताच्या  विरुद्ध काढले आहेत. यामध्ये 3 शतक आणि 1 अर्धशतकाचा समावेश आहे. टेलरने भारताविरुद्ध 2012 साली शेवटचे शतक झळकावले आहे. भारताकडून इशांत शर्मा (Ishant Sharma) टेलरसाठी त्रासदायक ठरु शकतो. त्याने टेलरला चार वेळा आऊट केले आहे. न्यूझीलंड विजयाच्या उंबरठ्यावर न्यूझीलंडची टीम इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विजयाच्या उंबरठ्यावर आहे. या मालिकेतील पहिली टेस्ट ड्रॉ झाली होती. दुसऱ्या टेस्टमधील दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडची अवस्था 9 आऊट 122 अशी झाली आहे. न्यूझीलंडकडं अजूनही 37 रनची आघाडी आहे. या टेस्टचे दोन दिवस शिल्लक आहेत. WTC Final : न्यूझीलंडच्या अनुभवी बॅट्समननं विराटला टाकलं मागं, टीम इंडियाला इशारा न्यूझीलंड 22 वर्षांनंतर इंग्लंड विरुद्ध विजय मिळवण्याच्या उंबरठ्यावर आहे. यापूर्वी 1999 साली स्टिफन प्लेमिंगच्या नेतृत्त्वाखाली न्यूझीलंडने इंग्लंडचा 2-1 ने पराभव केला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, New zealand, Virat kohli

    पुढील बातम्या