क्रिकेटमध्ये 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, माजी मुख्यमंत्री EDच्या रडारवर

क्रिकेटमध्ये 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, माजी मुख्यमंत्री EDच्या रडारवर

बीसीसीआयने दिलेल्या निधीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांची EDने तब्बल सहा तास चौकशी केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 ऑगस्ट : जम्मू काश्मीर क्रिकेट असोशिएशनमधील कथित 113 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी राज्याचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने चौकशी केली. तब्बल सहा तास चाललेल्या चौकशीत या प्रकरणी फारुख अब्दुल्ला यांच्यावर EDने प्रश्नांचा भडीमार केला. बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता सुरू झालेली चौकशी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होती.

मनी लाँड्रिंगविरोधी कायद्यानुसार फारुख अब्दुल्ला यांची चौकशी करण्यात येत आहे. बीसीसीआयने 2002 ते 2011 या काळात जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनला देण्यात आलेल्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप झाला होताय. याप्रकरणी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात सीबीआयने अब्दुल्ला यांची चौकशी केली होती.

2015 मध्ये जम्मू काश्मीर उच्च न्यायालयात जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील गैरव्यवहाराचे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं होतं. उच्च न्यायालयानं म्हटलं होतं की, जम्मू काश्मीरचे पोलिस संबंधित प्रकरणाची योग्य प्रकारे चौकशी करू शकत नाहीत. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात येत आहे. तसेच या प्रकरणात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असेलेले फारुख अब्दुल्ला हे राजकारणी आणि माजी मुख्य मंत्री असल्याने सीबीआय योग्य पद्धतीने चौकशी करू शकेल असंही म्हटलं होतं.

फारुख अब्दुल्ला यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी वादग्रस्त अशा प्रस्तावांना मंजूरी दिली. जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे तत्कालिन सरचिटनिस मोहम्मद सलीम खान आणि खजिनदार एहसान मिर्झा यांनी बनावट खात्यांमधून व्यवहार केल्याचा आरोप आहे. 2011 मध्ये निवडणुका संपल्यानंतर आणि ट्रेजरर पदावरून हटवल्यानंतरही आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

दरम्यान, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांनी अशा प्रकारच्या गैरव्यवहाराचे खंडन केले आहे. तसेच या चौकशीमागे राजकरण असल्याचा आरोपही फारुख अब्दुल्ला यांनी केला होता. मात्र, सरकारने ही चौकशी तपास यंत्रणांमार्फत सुरू असून त्याचा राजकारणाशी संबंध नाही हे आधीच स्पष्ट केलं होतं.

धोनीसाठी World Cup मध्ये संघाने तडजोड केली? निवड समितीचे अध्यक्ष म्हणतात...

टीम इंडियात विराटचे राज्य, प्रशिक्षकपदाची माळ रवी शास्त्रींच्याच गळ्यात?

Ashes : अत्तराच्या बाटलीत राख असेलली प्रतिष्ठेची ट्रॉफी, जाणून घ्या रंजक इतिहास

'पतली कमर'वर महिला पोलिसांचा TIKTOK व्हिडिओ व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 01:25 PM IST

ताज्या बातम्या