Home /News /sport /

IND vs ENG: मँचेस्टर टेस्टचा निर्णय ICC च्या कोर्टात, ECB नं मागितली दाद

IND vs ENG: मँचेस्टर टेस्टचा निर्णय ICC च्या कोर्टात, ECB नं मागितली दाद

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील सीरिजमधील पाचव्या आणि अंतिम टेस्टबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. आता या . प्रकरणात इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) आयसीसीकडं दाद मागितली आहे.

    मुंबई, 12 सप्टेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्या सीरिजमधील पाचव्या आणि अंतिम टेस्टबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणारी ही टेस्ट टॉसच्या 2 तास आधी रद्द करण्यात आली होती. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) आता या विषयावर आयसीसीला (ICC) पत्र लिहलं आहे.  या प्रकरणात तातडीनं निर्णय घ्यावा अशी विनंती इसीबीनं केली आहे. दोन्ही देशांमधील पाचवी टेस्ट शुक्रवारी (10 सप्टेंबर) सुरू होणार होती. पण जवळपास दोन तासांपूर्वी कोरोना व्हायरसच्या भीतीनं ही टेस्ट रद्द करण्यात आली. भारतीय टीमचे हेड कोच रवी शास्त्रींसह (Ravi Shastri) काही सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला. आयसीसी समोरचे पर्याय काय? आता मँचेस्टर टेस्ट पुढील वर्षी पुन्हा आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. इसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरीसन यांनी शुक्रवारी हे संकेत दिले आहेत. पण जर ही मॅच कोव्हिड - 19 च्या कारणांमुळे रद्द केल्याचं आयसीसीनं जाहीर केलं तर त्या टेस्टला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्समध्ये जोडण्यात येणार नाही. त्या परिस्थितीमध्ये दोन्ही टीमना या मॅचचे कोणतेही पॉईंट मिळणार नाहीत. त्यानंतर भारतीय टीमला 2-1 नं विजयी घोषित करण्यात येईल. दुसरा एक पर्याय म्हणजे भारतीय टीम ही टेस्ट खेळण्यास असमर्थ ठरली असं आयसीसीच्या समितीला वाटले तर या टेस्टमध्ये इंग्लंडला विजयी घोषित करण्यात येईल. त्या परिस्थितीमध्ये ही सीरिज 2-2 नं बरोबरीत सुटेल. यापूर्वी बीसीसीआयनं ही टेस्ट मॅच रद्द केल्याचं प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केले होते. बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड सामंजस्याने रद्द झालेली ही टेस्ट मॅच भविष्यात वेळ असेल तेव्हा खेळवतील. यासाठी तारीख शोधली जाईल, असं बीसीसीआयने सांगितलं आहे. खेळाडूंची सुरक्षा आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे, याबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही, असं बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. IPL 2021 वर कोरोनाचं संकट, 'या' 6 खेळाडूंवर असेल BCCI चं विशेष लक्ष! दोन्ही बोर्डांचा दावा काय? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) नियमानुसार एखाद्या टीमच्या फिल्डिंग करण्याच्या क्षमतेवर कोरोनामुळे प्रभाव पडत असेल तर त्या टीमला माघार घेण्याचा अधिकार आहे. बीसीसीआयनं या नियमावर बोट ठेवले आहे. तर भारतीय टीममधील 20 पैकी कोणत्याही सदस्याला कोरोनाची लागण झालेली नव्हती. त्यामुळे ही टेस्ट कोरोनामुळे रद्द झाली नाही, असा दावा इसीबीनं केला आहे. खेळाडूंचे मानसिक आरोग्य आणि हित लक्षात घेता ही टेस्ट रद्द केल्याचा दावा इसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरीसन यांनी केला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India vs england

    पुढील बातम्या