मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS: ब्रिस्बेन टेस्टवर पुन्हा संकट, कोरोना स्ट्रेन सापडल्यानं शहरात लॉकडाऊन लागू

IND vs AUS: ब्रिस्बेन टेस्टवर पुन्हा संकट, कोरोना स्ट्रेन सापडल्यानं शहरात लॉकडाऊन लागू

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS ) यांच्यात ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) होणाऱ्या चौथ्या टेस्टवर संकटाचे ढग जमा झाले आहेत.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS ) यांच्यात ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) होणाऱ्या चौथ्या टेस्टवर संकटाचे ढग जमा झाले आहेत.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS ) यांच्यात ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) होणाऱ्या चौथ्या टेस्टवर संकटाचे ढग जमा झाले आहेत.

सिडनी, 8 जानेवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia ) यांच्यात ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) होणाऱ्या चौथ्या टेस्टवर संकटाचे ढग जमा झाले आहेत. क्वीन्सलँड (Queensland) सरकारने ब्रिस्बेन शहरात तीन दिवसांचा कडक लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केला आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहा ते सोमवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असेल. ब्रिस्बेनमध्ये कोरोना व्हायरसचं (Coronavirus) नवं प्रकरण समोर आल्यानंतर तेथील सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

नवा कोरोना व्हायरस दाखल!

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीम 12 जानेवारी रोजी ब्रिस्बेनमध्ये दाखल होणार आहेत. त्यांना एक दिवस हॉटेलमधील रुममध्येच कडक बंधनात राहवं लागेल. व्हायरसचा प्रसार झाला तर लॉकडाऊन वाढवण्यास हयगय करणार नाही, असं स्थानिक सरकारनं स्पष्ट केलं आहे.

ब्रिस्बेनमधील एका क्वारंटाईन हॉटेलच्या कर्मचाऱ्याला नव्या कोरोना व्हायरसचा (New Coronavirus Strain) संसर्ग झाल्यामुळे सरकारनं हा कडक निर्णय घेतला आहे. ब्रिस्बेन हे ऑस्ट्रेलियाचं तिसऱ्या क्रमांकाचं शहर असून त्याची लोकसंख्या 20 लाख इतकी आहे.

“हा अतिशय गंभीर प्रकार आहे. व्हायरसला रोखण्यासाठी आम्ही सर्व आवश्यक उपाय करणार आहोत. ग्रेटर ब्रिस्बेनचा परिसर हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आला आहे,’’ अशी माहिती ब्रिस्बेनच्या प्रीमियरनं दिली आहे. ‘ब्रिस्बेन टेस्टबाबत सकारात्मक चर्चा सुरु आहे’, असं त्यांनी स्पष्ट केलं.

भारतीय टीम ब्रिस्बेनमध्ये जाणार नाही?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी टेस्ट सध्या सिडनीमध्ये सुरू आहे. यानंतर सीरिजची चौथी आणि शेवटची टेस्ट ब्रिस्बेनमध्ये 15 जानेवारीपासून होणार आहे. पण ब्रिस्बेनमधल्या या टेस्ट मॅचबाबत अजूनही वाद सुरूच आहेत. ब्रिस्बेनमधल्या क्वारंटाईनच्या नियमांमुळे टीम इंडिया चौथी टेस्ट खेळू इच्छित नाही, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

माध्यमांमधल्या वृत्तानुसार ब्रिस्बेनमध्ये क्वारंटाईनचा नियम पाळावा लागला, तर चौथी टेस्ट सिडनीमध्ये आयोजित केली जाऊ शकते, किंवा ही सीरिज तीन टेस्ट मॅचचीच होऊ शकते. असं झालं तर भारतीय टीम तिसऱ्या टेस्टनंतरच मायदेशी परतेल.

First published:

Tags: Cricket