रायूडूला वर्ल्ड कपसाठी डावलून मोठी चूक केली, निवड समिती सदस्याची कबुली

2019 वर्ल्ड कपमध्ये विजय शंकर (Vijay Shankar) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) या अनुभव नसणाऱ्या खेळाडूंना संधी दिली गेली, पण अंबाती रायुडू (Ambati Rayudu) सारख्या अनुभवी खेळाडूला डावललं गेलं.

2019 वर्ल्ड कपमध्ये विजय शंकर (Vijay Shankar) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) या अनुभव नसणाऱ्या खेळाडूंना संधी दिली गेली, पण अंबाती रायुडू (Ambati Rayudu) सारख्या अनुभवी खेळाडूला डावललं गेलं.

  • Share this:
    मुंबई, 22 नोव्हेंबर : 2019 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने शानदार कामगिरी केली होती, पण सेमी फायनलमध्ये त्यांचा न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाला आणि स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. टीमची मधली फळी कमकवूत असल्यामुळे भारताचं स्वप्न पूर्ण झालं नसल्याची टीका करण्यात आली. वर्ल्ड कपसाठी विजय शंकर (Vijay Shankar) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) या अनुभव नसणाऱ्या खेळाडूंना संधी दिली गेली, पण अंबाती रायुडू (Ambati Rayudu) सारख्या अनुभवी खेळाडूला डावललं गेलं. निवड समितीच्या या निर्णयावर तेव्हाही टीका झाली होती. आता मात्र अंबाती रायुडूला संधी न देऊन मोठी चूक केल्याचं निवड समितीचे माजी सदस्य देवांग गांधी (Devang Gandhi) यांनी मान्य केलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना देवांग गांधी म्हणाले, 'रायुडूला 2019 वर्ल्ड कपला संधी न देणं मोठी चूक होती. आम्हीही माणसं आहोत. आम्ही योग्य टीम निवडल्याचं तेव्हा आम्हाला वाटलं, पण नंतर वाटलं रायुडू असता तर टीमला मदत झाली असती. संपूर्ण स्पर्धेत टीमने फक्त एक दिवस खराब खेळ केला आणि रायुडूची अनुपस्थिती मोठा मुद्दा बनला. मी रायुडूची प्रतिक्रिया समजू शकतो.' अंबाती रायुडूने वर्ल्ड कप 2019 साठी निवड न झाल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली होती, पण काही काळानंतर त्याने निवृत्ती मागे घेत पुन्हा मैदानात पाऊल टाकलं. रायुडूच्याऐवजी संधी देण्यात आलेला विजय शंकर स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाला, यानंतर ऋषभ पंतला संधी देण्यात आली. सेमी फायनलमध्ये पंत खराब शॉट मारून आऊट झाला.
    Published by:Shreyas
    First published: