एडिलेड कसोटीदरम्यान, सचिनने पाठवला खास मेसेज, 'टीम इंडिया, चूकुनही करू नका ही चूक'

सचिनला हे चांगलंच माहीत आहे की, ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात भारतीय संघ कधीही मात करू शकतो.

News18 Lokmat | Updated On: Dec 8, 2018 09:53 AM IST

एडिलेड कसोटीदरम्यान, सचिनने पाठवला खास मेसेज, 'टीम इंडिया, चूकुनही करू नका ही चूक'

एडिलेड, ०८ डिसेंबर २०१८- कसोटी सामन्यात टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी अपेक्षेप्रमाणे सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर अश्विनची गोलंदाजी फार प्रभाव टाकत नव्हती. मात्र यावेळी त्याने पहिल्या षटकापासून आपलं महत्त्व पटवून दिलं. त्याने एका मागोमाग एक असे एकूण तीन विकेट घेत भारताला सामन्यात परत आणले.


अश्विन गेल्यावेळीस जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता, तेव्हा त्याने खूप सारे शॉर्ट बॉल टाकले होते. त्याच्या गोलंदाजीत वेगही खूप होता. मात्र या चार वर्षात अश्विनने ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीवर कशी गोलंदाजी करायची हे शिकून घेतले. दुसऱ्या दिवशी भारताने गोलंदाजीला सुरुवात केली तेव्हा पहिल्या चेंडूपासून त्याने बॉलिंगचा स्पिड कमी ठेवला होता आणि तो चेंडू वरती पिच करत होता. त्याची ही शक्कल कामी आली आणि ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर त्याच्यासमोर ढासळली.


टीम इंडियाच्या या स्ट्रॅटिजीवर मास्टर ब्लास्टर फार खुश होत त्याने ट्विटरवर टीम इंडियाला एक सल्लाही दिला. त्याने ट्विट करत म्हटले की, ‘टीम इंडिया परिस्थितीचा जेवढा फायदा घेता येत असेल तेवढा घ्या आणि सामन्यावरुन स्वतःची पकड सैल पडू देऊ नका. मी कधीही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडुंना इतकं हळू खेळताना पाहिलं नाही. अश्विनने अप्रतिम गोलंदाजी केली आणि संघाला ज्या भूमिकेची गरज आहे ती तो निभावताना दिसत आहे. यामुळेच या सामन्यात इंडियाचं पारडं जड आहे.’

Loading...
सचिनला हे चांगलंच माहीत आहे की, ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात भारतीय संघ कधीही मात करू शकतो. अशात जर सामन्यात मिळवलेली पकड सैल पडली तर ऑस्ट्रेलियाचा संघ कधीही सामना पलटवू शकतो. त्यामुळे दुसऱ्या डावात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाचा कसा सामना करते हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.


Live Cricket Score, India vs Australia 1st Test, 3rd Day, ऑस्ट्रेलिया २३५ ला ऑला आऊट, मात्र पुन्हा सुरू झाला पाऊस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2018 09:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...