मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL च्या नव्या पर्वाचा Disney+ Hotstarला फटका, 1.5 कोटी सबस्क्रायबर्स कमी होणार!

IPL च्या नव्या पर्वाचा Disney+ Hotstarला फटका, 1.5 कोटी सबस्क्रायबर्स कमी होणार!

डिस्ने प्लस हॉटस्टारला (Disney + Hotstar) यावेळी इंडियन प्रीमिअर लीग (IPL) स्पर्धेचे डिजिटल स्ट्रिमिंग अधिकार खरेदी करता आले नाहीत.

डिस्ने प्लस हॉटस्टारला (Disney + Hotstar) यावेळी इंडियन प्रीमिअर लीग (IPL) स्पर्धेचे डिजिटल स्ट्रिमिंग अधिकार खरेदी करता आले नाहीत.

डिस्ने प्लस हॉटस्टारला (Disney + Hotstar) यावेळी इंडियन प्रीमिअर लीग (IPL) स्पर्धेचे डिजिटल स्ट्रिमिंग अधिकार खरेदी करता आले नाहीत.

मुंबई, 16 जून :  इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल (IPL) स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील डिजिटल, टीव्ही प्रसारणाच्या हक्कांचा लिलाव नुकताच पार पडला. वॉल्ट डिस्ने (Walt Disney) कंपनीच्या व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारला (Disney + Hotstar) यावेळी इंडियन प्रीमिअर लीग (IPL) स्पर्धेचे डिजिटल स्ट्रिमिंग अधिकार खरेदी करता आले नाहीत. या व्यवहाराचा थेट परिणाम त्यांच्या सब्सक्रायबर्सच्या संख्येवर होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. यंदा IPL च्या डिजिटल स्ट्रिमिंग अधिकारांसाठीची बोली Viacom18 ने जिंकली आहे.

काय होणार परिणाम?

डिस्ने+ हॉटस्टारच्या एकूण सब्सक्रायबर्सची (Subscribers) संख्या सध्या सुमारे 5 कोटी आहे. सिंगापूरमध्ये मुख्यालय असलेली रिसर्च फर्म 'मीडिया पार्टनर्स एशिया' चे कार्यकारी संचालक विवेक कुटो यांच्या म्हणण्यानुसार, IPL स्पर्धेचे डिजिटल राईट्स मिळवण्यात अपयशी झाल्यामुळे डिस्ने+ हॉटस्टारच्या सबस्क्रायबर्सची संख्या तब्बल 1.5 कोटींनी कमी होऊ शकते. अचानक इतके सब्सक्रायबर्स कमी झाल्यास हा डिस्ने हॉटस्टारसाठी मोठा धक्का असेल.

कंपनीने 2024 च्या अखेरीस सबस्क्रायबर्स संख्या 23 ते 26 कोटींपर्यंत पोहोचवण्याचं आणि स्ट्रिमिंग सर्व्हिस सेगमेंटमधील ग्लोबल लीडर नेटफ्लिक्सला (Netflix) मागे टाकण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. मात्र, आयपीएल लिलावात बाजी मारण्यात अपयशी ठरल्याने डिस्ने+ हॉटस्टारच्या या उद्दिष्टावर परिणाम होण्याची आणि सबस्क्रायबर्स वाढण्याऐवजी कमी होण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या लिलावात Viacom18 ने भारतीय उपखंडासाठी IPL चे डिजिटल स्ट्रिमिंग राइट्स (Digital Streaming Rihts) 23,758 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. कंपनीला पुढील 5 वर्षांसाठी म्हणजे 2023 ते 2027 पर्यंत हे अधिकार मिळाले आहेत. तर वॉल्ट डिस्नेची भारतीय शाखा असलेल्या डिस्ने स्टारला 23,575 कोटी रुपयांना 5 वर्षांसाठी टेलिव्हिजन राइट्स (Television Rights) मिळाले आहेत.

“डिस्नेकडे अजूनही टेलिव्हिजनचे राईट्स आहेत. त्याच्या जाहिरातींमधून जास्त महसूल मिळतो. आयपीएलची टीव्ही डिस्ट्रिब्यूशन फी सध्या स्टार/डिस्ने इंडियाकडे आहे; पण गेल्या दोन वर्षांमध्ये डिजिटल माध्यमांचा वाढलेला वापर लक्षात घेता असं म्हणता येईल की व्हायकॉम 18 स्ट्रिमिंग प्लेला या सौद्यामुळे मोठा फायदा होईल," असं कुटो यांनी म्हटलंय.

क्रिकेट फॅन्सचा आनंद आणखी वाढणार, नीता अंबानी यांनी जाहीर केलं मिशन

काय आहे कंपनीचे स्पष्टीकरण?

दरम्यान, IPL चे डिजिटल स्ट्रिमिंग राइट्स खरेदी करण्यात अयशस्वी झाल्यानंतर डिस्ने स्टारने एक निवेदन प्रसिद्ध केलंय. त्यानुसार, डिस्ने स्टार भारतीय उपखंडातील डिस्ने+ हॉटस्टार (Disney+ Hotstar) आणि त्यांच्या टीव्ही चॅनेलसाठी ओरिजनल एंटरटेनमेंट कंटेंट तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. त्याचबरोबर आगामी काळात ते इतर खेळ आणि स्पर्धांचे हक्क मिळवण्यावर भर देणार आहेत, असंही या निवेदनातून स्पष्ट करण्यात आलं आहे.

First published:

Tags: BCCI, Cricket news, Ipl