• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • DK-Dipika love story: कार्तिकनं जिमपासून इंग्लंडपर्यंत केला दीपिकाचा पाठलाग... वाचा कशी जुळली दोघांची मनं

DK-Dipika love story: कार्तिकनं जिमपासून इंग्लंडपर्यंत केला दीपिकाचा पाठलाग... वाचा कशी जुळली दोघांची मनं

टीम इंडियाचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) नुकताच जुळ्या मुलांचा बाबा झाला आहे. कार्तिकनं बुधवारी ही माहिती जाहीर केली. कार्तिकची लव्ह स्टोरी देखील चांगलीच फिल्मी आहे.

 • Share this:
  मुंबई, 29 ऑक्टोबर: टीम इंडियाचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) नुकताच जुळ्या मुलांचा बाबा झाला आहे. कार्तिकनं बुधवारी ही माहिती जाहीर केली. कार्तिकची पत्नी दीपिका पल्लीकल (Dipika Pallikal) ही देखील खेळाडू असून ती भारतासाठी स्क्वॅश खेळते. या दोघांनी 2015 साली लग्न केले होते. टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या दोन स्टार खेळाडूंची लव्ह स्टोरी (Love Story) पूर्ण फिल्मी आहे. दीपिका पल्लीकल्लनं एका मुलाखतीच्या दरम्यान दोघांची लव्हस्टोरी उलगडली आहे. कार्तिकनं 2012 साली सर्वप्रथम दीपिकाला डिनरसाठी येणार का? असा मेसेज केला होता. त्यावेळी दोघांची कोणताही ओळख नव्हती. कसलीही ओळख नसताना कार्तिकचा हा मेसेज पाहून दीपिकाला धक्का बसला होता. कार्तिक आणि दीपिका एकाच शहरातील (चेन्नई) आहेत. दीपिकाच्या आईची ट्रॅव्हल एजन्सी आहे. याच एजन्सीकडून कार्तिक गाडी बुक करत असे. दीपिकानं पुढं सांगितलं,' मला काही दिवसांचमध्येच कार्तिकचे 5-6 मेसेज आले. मी प्रत्येक वेळी नवं कारण सांगून टाळत असे. एकदा कार्तिकनं तिला चेन्नईत कधी असलीस तर सांग असा मेसेज केला. त्यावर दीपिकानं मी चेन्नईत आहे, पण मला उद्या ऑस्ट्रेलियाला जायचं आहे, असा मेसेज केला. ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर पाहू.' असा मेसेज केला. याच मेसेजनं त्यांच्या लव्ह स्टोरीची सुरूवात झाली. दीपिका ज्या जिममध्ये ट्रेनिंग करत असे तिथं कार्तिक सकाळी सहा वाजता पोहचला. ती दीपिकाच्या ट्रेनिंगची वेळ होती. कार्तिकही त्याच जिमचा मेंबर होता. पण, त्याच्या ट्रेनिंगची वेळ वेगळी होती. ही गोष्ट दीपिकाला माहिती नव्हती. 'कार्तिक मला भेटायला आला आहे हे माहिती होतं. कारण तो इतक्या सकाळी कधीही ट्रेनिंगला आला नव्हता. त्यानं मला फ्लाईट कधी आहे हे विचारलं. मी त्यावेळी आजारी असल्याचं कारण सांगितलं. हे कारण खोटं असल्याचं आम्हाला माहिती होते. कार्तिकचे काही मित्र आम्हाला पाहात होते. ते पाहून मला वाईट वाटले. कार्तिकनं मला पुन्हा एकदा फ्लाईट कधी आहे हा मेसेज केला. त्यावर मला उद्या दिवसभर ट्रेनिंग करायची आहे, मी सकाळी 7 वाजता फ्री आहे, असं सांगितलं. हा मेसेज वाचल्यानंतर कार्तिक नकार देईल असं मला वाटलं होतं. पण, तसं झालं नाही. 'आता तिघांचे पाच झालो'; दिनेश कार्तिकने चाहत्यांना दिली Good News दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ब्रेकफास्टला भेटलो. आम्ही कार्तिकच्या कारमधून ब्रेकफास्टला गेलो. आम्ही तिथं जवळपास चार तास गप्पा मारल्या. आमच्या गप्पा संपतच नव्हत्या. त्यानंतर मला दोन दिवसांनी इंग्लंडला जायचं होतं. ही फक्त एक डेट असेल आम्ही त्यानंतर कधीही भेटणार नाही, असं मला वाटलं होतं. पण कार्तिक नंतर इंग्लंडमध्येही आला.' अशी आठवण दीपिकानं सांगितली. दीपिका ही दिनेश कार्तिकची दुसरी पत्नी आहे. यापूर्वी पहिली पत्नी निकितासोबत त्याचा 2012 साली घटस्फोट झाला होता.दिनेश कार्तिक भारतासाठी 26 टेस्ट, 94 वनडे आणि 32 T20 इंटरनेशनल सामने खेळला आहे. ज्यात त्याने 3000 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने भारतासाठी शेवटची मॅच 2019 मध्ये खेळली होती.
  Published by:News18 Desk
  First published: