'गांगुलीने खूप जबाबदाऱ्या घेतल्या', भारताच्या माजी कर्णधाराचा निशाणा

'गांगुलीने खूप जबाबदाऱ्या घेतल्या', भारताच्या माजी कर्णधाराचा निशाणा

भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याच्यावर टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 9 नोव्हेंबर : भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याच्यावर टीका केली आहे. गांगुलीने टीमची निवड, आयपीएलचं वेळापत्रक आणि वेगवेगळ्या मुद्द्यांची जबाबदारी घेतल्याचं वेंगसरकर म्हणाले आहेत. सौरव गांगुली आयपीएलचं वेळापत्रक, निवड झालेले खेळाडू यांच्याबद्दल वारंवार बोलत आहे. बीसीसीआय अध्यक्ष म्हणून गांगुली बराच सक्रीय आहे. काहीच दिवसांपूर्वी त्याने रोहित शर्माचा फिटनेस आणि केएल राहुलच्या टेस्ट निवडीबाबत भाष्य केलं होतं. अनेकांना गांगुलीचं हे सक्रीय असणं आवडत असलं तरी वेंगसरकर यांनी मात्र याचवरुन नाराजी व्यक्त केली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना वेंगसरकर म्हणाले, 'जेव्हा आयपीएलच्या तारखा आणि ठिकाणाबाबत चर्चा सुरू होती, तेव्हा गांगुली आयपीएल अध्यक्षासारखा बोलत होता. हे दु:खद आहे. गांगुली त्या लोकांची विश्वासार्हता कमी असल्याचं दाखवत आहे किंवा त्याला इतरांना कमी कळंत असं सांगायचं आहे.'

'माजी क्रिकेटपटूंनीच खेळ चालवावा, असं माझं म्हणणं आहे. गांगुलीकडून मला बऱ्याच अपेक्षा आहेत, पण मी आजपर्यंत जे बघितलं ते पाहून माझं मन बदललं आहे. निवड समिती किंवा बोर्ड यांच्यातलं कोणीही रोहित शर्माच्या फिटनेसबाबत बोललं नाही. रोहितला टीममधून काढण्याचं कारण काय? बीसीसीआयच्या फिजियोने सांगितलं की रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. मग त्याला मुंबईच्या फिजियोने कसं खेळून दिलं? दोन्ही फिजियोंची मतं वेगळी का आहेत? चार मॅचनंतर रोहित मुंबईच्या टीममध्ये आला आणि मंगळवारी तो आयपीएल फायनल खेळेल,' असं वेंगसरकर म्हणाले.

रोहित शर्माबाबत झालेल्या वादानंतर आता बीसीसीआयने रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याला वनडे आणि टी-20 सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली असली, तरी टेस्ट टीममध्ये त्याची निवड झाली आहे.

Published by: Shreyas
First published: November 9, 2020, 7:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या