21 चेंडूत शतक करणाऱ्या 'या' खेळाडूकडे भारताच्या अंडर 19 संघाचं नेतृत्व

21 चेंडूत शतक करणाऱ्या 'या' खेळाडूकडे भारताच्या अंडर 19 संघाचं नेतृत्व

भारताचा अंडर 19 संघ सप्टेंबरमध्ये यूथ एशिया कप स्पर्धेत खेळणार आहे. यासाठी युवा खेळाडूकडे नेतृत्व सोपवलं आहे.

  • Share this:

मुंबई, 30 जुलै : भारताचा ज्यूनिअर संघ सप्टेंबरमध्ये यूथ एशिया कपमध्ये सहभागी होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने अंडर 19 संघाची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व नोएडाच्या ध्रुव चंद जुरेल याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. यष्टीरक्षक फलंदाज असलेला ध्रुव 3 ते 15 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या यूथ एशिय कपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल.

सध्या भारताचा अंडर 19 संघ इंग्लंडमध्ये तिरंगी मालिका खेळत आहे. भारत, इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या या मालिकेत ध्रुवने चुणूक दाखवली आहे. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशकडून कूच विहार ट्रॉफीत 11 सामन्यांमध्ये 762 धावा केल्या होत्या. यात तीन शतके केली होती. याशिवाय यष्टीमागे 51 गडी बाद केले होते.

ध्रुवने 2017 मध्ये मध्य प्रदेश आणि आग्रा यांच्यात झालेल्या टी20 सामन्यात 21 चेंडूत शतक केलं होतं. त्या स्पर्धेत मालिकावीरचा पुरस्कारही त्यानं पटकावला होता. 2014 मध्ये अंडर 17 स्कूल नॅशनल क्रिकेट टी20 चॅम्पियनशिपमध्ये तो सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला होता. त्यात स्पर्धेत ध्रुवनं 6 सामन्यात 4 शतकं आणि 2 अर्धशतकं केली होती.

ध्रुवची चार महिन्यांपूर्वीच अंडर 19 संघात निवड झाली होती. त्यानंतर तो दोन मालिका खेळला आहे. सध्याचा कर्णधार प्रियम गर्ग या मालिकेत खेळणार नसल्यानं ध्रुवकडे नेतृत्व देण्यात आलं आहे.

VIDEO: 'कोणा गणेशच्या जाण्याने पक्ष संपत नसतो', आव्हाडांची नाईकांवर जहरी टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Jul 30, 2019 06:11 PM IST

ताज्या बातम्या