मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

टिप-टिप बरसा पानी: काश्मीरच्या बर्फात चहलबरोबर थिरकली धनश्री, VIDEO

टिप-टिप बरसा पानी: काश्मीरच्या बर्फात चहलबरोबर थिरकली धनश्री, VIDEO

भारतीय स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. तो पत्नी धनश्री वर्मासोबत (Dhanashree Verma) जम्मू काश्मीरमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 26 डिसेंबर : भारतीय स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. तो पत्नी धनश्री वर्मासोबत (Dhanashree Verma) जम्मू काश्मीरमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. धनश्रीनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत चहल देखील असून धनश्री 'टिप-टिप बरसा पानी' या लोकप्रिय हिंदी गाण्यावर डान्स करत आहे. धनश्री वर्मा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. ती नेहमी डान्सचे वेगवेगळे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. ते व्हिडीओ चांगलेच व्हायरल (Video Viral) होतात. धनश्रीनं अपलोड केलेला हा व्हिडीओ जम्मू काश्मीरमधील गुलमर्गमध्ये शूट केला आहे. काश्मीरमधील हे ठिकाण तिथं होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. 'टिप-टिप बरसा स्नो (बर्फ). खरं सांगायचं तर या जागेचं सौंदर्य हे स्वर्गासारखं आहे. माफ करा साडीमध्ये डान्स केला नाही.' असं कॅप्शन धनश्रीनं या व्हिडीओला दिलं आहे. 'टिप-टिप बरसा पानी' या फिल्मी गाण्यात रविना टंडननं साडीमध्ये डान्स केला आहे. या गाण्याचा रिमेक यावर्षी आला असून त्यातही कतरिना कैफनं साडीतच डान्स केला आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील वन-डे सीरिजसाठी चहलची निवड होण्याची दाट शक्यता आहे. वन-डे क्रिकेटमध्ये 100 विकेट्सचा टप्पा पूर्ण करण्यापासून तो 3 पाऊल दूर आहे.  त्यानं आजवर 56 वन-डे खेळल्या आहेत. चहलनं त्याची शेवटची मॅच न्यूझीलंड विरुद्ध कोलकातामध्ये खेळली होती. त्याने टी20 इंटरनॅशनलमध्ये 64 विकेट्स घेतल्या आहेत.
First published:

Tags: Cricket news, Instagram, Video viral, Yuzvendra Chahal

पुढील बातम्या