Home /News /sport /

बांगलादेश क्रिकेटमधील आणखी एक प्रताप, आंतरराष्ट्रीय खेळाडूनं दुसऱ्यावर फेकली वीट

बांगलादेश क्रिकेटमधील आणखी एक प्रताप, आंतरराष्ट्रीय खेळाडूनं दुसऱ्यावर फेकली वीट

ढाका प्रीमियर लीग 2021 (Dhaka Premier League) मधील वाद चिघळत आहेत. मंगळवारी झालेल्या मॅचच्या दरम्यान रहमनानने कोणतंही कारण नसताना इलियासवर वीट फेकली. तसेच त्याला उद्देशून वर्णद्वेषी शिवीगाळ केली.

    ढाका, 17 जून : ढाका प्रीमियर लीग 2021  (Dhaka Premier League) मधील वाद चिघळत आहेत. या स्पर्धेतील एका मॅचमध्ये बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला क्रिकेटपटू सब्बीर रहमान (Sabbir Rahman) याने गंभीर शिस्तभंग केला आहे. डीएसओएस क्लब विरुद्ध शेख जमाल धनमंडू क्लबमधील मॅचमध्ये त्याने हा प्रकार केला आहे. विशेष म्हणजे रहमान ही मॅच खेळत नव्हता. त्याच्यावर शेख जमालचा स्पिनर इलियास सनीवर (Elias Sunny) वीट फेकल्याचा आरोप आहे. रहमानने यावेळी इलियासला वर्णद्वेषी टिप्पणी केली. संपूर्ण क्रिकेट विश्व वर्णद्वेषाचे प्रकरण गांभीर्याने घेत असतानाच त्याने ही कृती केली आहे. या प्रकरणात शेख जमाल टीमने ढाका मेट्रोपोलीस (सीसीडीएम) क्रिकेट समितीला पत्र लिहून रहमानला शिक्षा देण्याची मागणी केली आहे. 'मंगळवारी झालेल्या मॅचच्या दरम्यान रहमनानने कोणतंही कारण नसताना इलियासवर वीट फेकली. तसेच त्याला उद्देशून वर्णद्वेषी शिवीगाळ केली. त्याचे हे वर्तन केवळ अशोभनीय नाही तर कारवाईसाठी योग्य आहे. त्यामुळे रहमानवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी' अशी मागणी शेख जमाल टीमच्या वतीनं पाठवण्यात आलेल्या पत्रात करण्यात आली आहे. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशचं प्रतिनिधित्व केलेल्या सब्बीर रहमान यापूर्वी देखील वादग्रस्त ठरला आहे. त्याने 2017 साली एका प्रथमश्रेणी मॅचच्या दरम्यान प्रेक्षकाला मारहाण केली होती. त्यामुळे त्याला सहा महिन्याची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर 2018 मध्ये त्याने सोशल मीडियावर शिवीगाळ केली. त्यामुळे आयसीसीनं त्याच्यावर सहा महिन्याची बंदी घातली. 2019 मध्ये बांगलादेश टीमचा खेळाडू मेहदी हसन मिराजशी शाब्दिक चकमक केल्याचा त्याच्यावर आरोप झाला होता. शाकीब अल हसनवर कारवाई यापूर्वी याच स्पर्धेत बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकीब अल हसनने (Shakib Al Hasan) अंपायरसमोरच दोन वेळा स्टम्प उखडले आणि फेकून दिले. याचसोबत त्याने विरुद्ध टीमचे प्रशिक्षक खालीद महमूद (Khalid Mahamood) यांच्यासोबतही वाद घातला. साऊथम्पटनमधून टीम इंडियासाठी काळजीची बातमी, विराटला सतावतेय 'ती' चिंता शाकीबच्या या वर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर चौफेर टीका करण्यात आली. त्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) त्याला तीन सामन्यांसाठी निलंबित केलं आहे, याचसोबत त्याला 5 लाख टाका म्हणजेच जवळपास 4.2 लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news

    पुढील बातम्या