Home /News /sport /

IPL 2021: देवदत्त पडिक्कलचा संजू सॅमसनला दुहेरी धक्का! पराभवानंतर 'या' यादीतही टाकलं मागं

IPL 2021: देवदत्त पडिक्कलचा संजू सॅमसनला दुहेरी धक्का! पराभवानंतर 'या' यादीतही टाकलं मागं

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (RCB) देवदत्त पडिक्कलनं (Devdutt Padikkal) गुरुवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध शतक झळकावलं. त्याचं हे आयपीएलमधील पहिलंच शतक आहे.

    मुंबई, 23 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (RCB) देवदत्त पडिक्कलनं (Devdutt Padikkal) गुरुवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध शतक झळकावलं. त्याचं हे आयपीएलमधील पहिलंच शतक आहे. संजू सॅमसनच्या (Sanju Samson) राजस्थान रॉयल्सच्या पराभावात या शतकाचा मोठा वाटा होता. त्याचबरोबर पडिक्कलनं संजूला आणखी एका विक्रमाच्या यादीमध्ये मागं टाकलं आहे. देवदत्त पडिक्कलनं मागच्या आयपीएल सिझनमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं या सिझनमध्ये पहिलं शतक झळकावलं. हे शतक झळकावताना त्याचं वय 20 वर्ष आणि 289 दिवस इतकं होतं. त्यामुळे तो आता आयपीएलमध्ये शतक करणारा तिसरा तरुण बॅट्समन बनला आहे. कोण आहे अव्वल? आयपीएलमध्ये शतक झळकावणाऱ्या तरुण बॅट्समनच्या यादीत मनिष पांडे (Manish Pandey) पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानं 2009 च्या आयपीएलमध्ये शतक झळकावलं तेंव्हा त्याचं वय 19 वर्ष आणि 253 दिवस इतकं होतं. मनिष आयपीएलमध्ये शतक करणारा पहिला भारतीय देखील आहे. या यादीमध्ये सध्या दिल्ली कॅपिटल्सचा (DC) कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh Pant) आघाडीवर आहे. पंतनं 2018 साली 20 वर्ष आणि 2018 दिवसाचा असताना सनरायझर्स हैदराबाद (SRH) शतक झळकावले होते. देवदत्तची एन्ट्री सर्वात तरुण शतकवीरांच्या यादीत आता देवदत्त पडिक्कलची तिसऱ्या क्रमांकावर एन्ट्री झाली आहे. यापूर्वी संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर होता. संजूनं 2017 साली रायझिंग पुणे सुपर जायंट्स विरुद्ध शतक केलं होतं. त्यावेळी संजूचं वय 22 वर्ष आणि 151 दिवस होतं. देवदत्तनं आता संजूला मागं टाकलं आहे. आरसीबीचा दणदणीत विजय आयपीएलच्या या सिझनमध्य्ये  विराट कोहलीची (Virat Kohli) आरसीबी अजूनही अजिंक्यच आहे. देवदत्त पडिक्कलचं नाबाद शतक आणि विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकामुळे आरसीबीने राजस्थान रॉयल्सचा ( 10 विकेटने पराभव केला. राजस्थानने ठेवलेलं 179 रनचं आव्हान बंगळुरुनं एकही विकेट न गमावता 16.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. पडिक्कलने 52 बॉलमध्ये नाबाद 101 रन तर विराट कोहलीने 47 बॉलमध्ये नाबाद 72 रन केले. पडिक्कलच्या खेळीमध्ये 6 सिक्स आणि 11 फोरचा समावेश होता. विराटने 3 सिक्स आणि 6 फोर मारले. IPL चा 'किंग' कोहलीच! 6000 रन्स काढणारा पहिला बॅट्समन,दुसऱ्या स्थानावर हा फलंदाज या सामन्यात बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. प्रथम बॅटिंग करत राजस्थानच्या टीमने 9 विकेट्स गमावत 177 रन्स केल्या आणि आरसीबीसला विजयासाठी 178 रन्सचं आव्हान दिलं. राजस्थान रॉयल्सकडून शिवम दुबे याने सर्वाधिक रन्स केले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, Rajasthan Royals, RCB, Rishabh pant, Sanju samson

    पुढील बातम्या