S M L

IPL 2019- दिल्ली डेअरडेविल्सचं बदललं नाव, श्रेयस अय्यर असेल कर्णधार

दिल्ली कॅपिटल्सने आपला कर्णधारही बदलला. १२ व्या सीझनमध्ये श्रेयस अय्यन संघाचा नवा कर्णधार असणार आहे.

Updated On: Mar 18, 2019 08:44 PM IST

IPL 2019- दिल्ली डेअरडेविल्सचं बदललं नाव, श्रेयस अय्यर असेल कर्णधार

नवी दिल्ली, ०४ डिसेंबर २०१८-  इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढच्या सीझनआधी दिल्ली फ्रेंचायझीने त्यांचं नाव बदललं आहे. आता दिल्ली डेअरडेविल्सची टीम दिल्ली कॅपिटल्स नावाने ओळखली जाणार. दिल्लीतील एका कार्यक्रमात दिल्ली फ्रेंचायजीचे मालक GMR ग्रुप आणि JSW Sports कडून ही घोषणा करण्यात आली.


दिल्लीचा संघ पहिल्या सीझनपासून आयपीएलमध्ये खेळत आहे. मात्र आतापर्यंत ते एकदाही जिंकू शकले नाही. आता नाव आणि लोगो बदलल्यावर नशीब बदलण्याचा विश्वास त्यांच्यात आला आहे. दिल्लीच्या संघाने ट्विटरवर नाव बदलण्याची माहिती देत म्हटले की, ‘दिल्लीकरांनो दिल्ली कॅपिटल्सला हाय म्हणा..’ दिल्लीच्या लोगोमध्ये तीन वाघ दिसत आहेत.Loading...श्रेयस अय्यर होणार नवा कर्णधार-


दिल्ली कॅपिटल्सने आपला कर्णधारही बदलला. १२ व्या सीझनमध्ये श्रेयस अय्यन संघाचा नवा कर्णधार असणार आहे. गेल्या सीझनमध्ये गौतम गंभीर कर्णधार होता. मात्र खराब प्रदर्शनामुळे त्याने आपलं कर्णधारपद सोडलं. गंभीरनंतर श्रेयसला कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यास दिली होती. आता पुढील सिझनसाठी श्रेयस फूल टाइम कर्णधार असणार आहे.


आयपीएल २०१९ मध्ये शिखर धवनही दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. धवन गेल्या सीझनमध्ये हैदराबाद सनरायझर्स संघाकडून खेळला होता. आता पुढच्या सीझन दिल्लीकडून खेळणार आहे. आयपीएलच्या सुरुवातीच्या सीझनमध्ये धवन दिल्लीकडूनच खेळायचा. आता पुन्हा त्याची दिल्लीच्या संघात वापसी झाली आहे.


Video : 'हा' पाकिस्तानी खेळाडू होता सोनाली बेंद्रेसाठी दिवाना


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 4, 2018 07:56 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close