दुबई, 10 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या फायनलमध्ये मुंबई (Mumbai Indians)चा सामना दिल्ली (Delhi Capitals)विरुद्ध होत आहे. 8 टीमसोबत सुरू झालेली ही स्पर्धा आता शेवटच्या 2 सर्वोत्तम टीमपर्यंत येऊन पोहोचली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता मुंबई पाचव्यांदा तर दिल्ली पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. मुंबईची इतिहासातली कामगिरी बघता अनेकांनी तेच पुन्हा आयपीएल जिंकतील असं भाकीत वर्तवलं आहे.
मुंबईने या मोसमात तीनवेळा दिल्लीचा पराभव केला आहे, पण दिल्लीची टीम कमकूवत नक्कीच नाही, त्यामुळे तेदेखील मुंबईचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरतील. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू डॉमनिक क्रॉक याच्यामते मुंबईची टीम सगळ्यात मजबूत आहे, कारण त्यांच्याकडे प्रत्येक खेळाडूचा पर्याय आहे. दिल्लीची टीमही त्याच फॉर्म्युलानुसार चालली आहे.
स्टार स्पोर्ट्सच्या शोमध्ये बोलताना डॉमनिक क्रॉक म्हणाला, 'दिल्लीची टीम मुंबईची नक्कल करत आहे. चांगल्या टीमची नक्कल करण्यात काहीच गैर नाही. दिल्लीच्या टीमला रातोरात यश मिळालेलं नाही. या टीमवर बरंच काम करण्यात आलं. पॉण्टिंगच्या प्रशिक्षणात दिल्ली चांगल्या भारतीय खेळाडूंना उभ करते आहे. त्यांना परदेशी खेळाडूंचीही साथ मिळत आहे.'
दिल्लीच्या टीमने ट्रेन्ट बोल्टसारख्या खेळाडूला सोडण्याचा निर्णय घेतला, पण हा निर्णय अत्यंत चूकीचा असल्याचं डॉमनिक क्रॉक म्हणाला. बोल्टने मुंबईसाठी 14 मॅचमध्ये 22 विकेट घेतल्या. तर दिल्लीकडून कगिसो रबाडा आणि एनरिच नॉर्किया यांनीही चांगली कामगिरी केली. रबाडाने स्पर्धेत सर्वाधिक 29 विकेट घेतल्या, तर नॉर्कियाला 20 विकेट घेता आल्या.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.