मुंबई, 22 जुलै: श्रीलंकेतील दुसऱ्या वन-डेमध्ये जबरदस्त खेळ करणारा दीपक चहर (Deepak Chahar) सध्या चर्चेत आहे. गेल्या तीन वर्षांपासून टीम इंडियात आत-बाहेर करणाऱ्या चहरला या खेळीनंतर सीनिअर टीममधील जागेचा दावेदार बनवलं आहे. दीपकनं नेहमीच स्वत:ला 'ऑल राऊंडर' समजलं आहे. पण एक वेळ अशी होती की, त्याला ऑल राऊंडर असल्याचा पश्चाताप झाला होता. दीपक चहरचे वडील लोकेंद्र चहरनं (Lokendra Chahar) यांनी याबाबतचा खुलासा केला आहे.
काय होता प्रसंग?
आयपीएल 2018 च्या लिलावाच्या दरम्यानचा (IPL 2018 Auction) हा प्रसंग आहे. या लिलावात दीपक चहरला चेन्नई सुपर किंग्सनं (Chenai Super Kings) 80 लाखांमध्ये खरेदी केले होते. तर त्याचा भाऊ राहुल चहरला (Rahul Chahar) मुंबई इंडियन्सनं 1 कोटी 90 लाखांना खरेदी केले.
लोकेंद्र चहर यांनी त्या प्रसंगाबद्दल सांगितले, 'ती आमची चूक होती. दीपकनं ऑल राऊंडर म्हणून फॉर्म भरला होता. त्या गटातील खेळाडूंचा लिलाव उशीरा झाला. राहुलने बॉलर म्हणून फॉर्म भरला होता. त्याचे नाव लवकर पुकारले गेले. दीपकची वेळ आली होती त्यावेळी टीमचा बराच पैसा संपला होता. आम्ही ही चूक केली नसती तर दीपकला दोन कोटी जास्त मिळाले असते.'
दीपकचा एक बॅट्समन म्हणून देखील चांगला रेकॉर्ड आहे. त्याने यापूर्वी देखील काही चांगल्या खेळी खेळल्या आहेत. सीएसकेसाठी देखील दीपकनं संस्मरणीय खेळी केली आहे. त्याला 6 क्रमांकावर प्रमोशन देण्यात आले होते, त्यावेळी दीपकनं 20 बॉलमध्ये 39 रन काढले होते.
The Hundred : पराभवानंतरही भारतीय कॅप्टनची चर्चा, इंग्लंडच्या खेळाडूनं केला सलाम!
दीपक आणि राहुल या दोन्ही भावांना लोकेंद्र यांनीच सुरुवातील क्रिकेटचे प्रशिक्षण दिले आहे. लोकेंद्र यावेळी पुढे म्हणाले की, 'दीपकनं त्याच्या शरीराच्या मर्यादा ओळखल्या आहेत. तो 140 किमी/तास या वेगाने बॉलिंग करु शकतो. मात्र ज्यावेळी त्याच्यावर मोठे स्पेल टाकण्याची जबाबदारी दिली त्यावेळी त्याने तो वेग 130/तास केला आहे. तो यापेक्षा जास्त वेगानं बॉलिंग करू शकतो. मात्र त्यासाठी त्याची जास्त शक्ती खर्च होईल. तसेच तो दुखापतग्रस्त होण्याची शक्यता जास्त आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India Vs Sri lanka