Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

डेव्हिड वॉर्नर बनला टायगर श्रॉफ, आलिया भट्ट सोबतचा डान्स VIRL

डेव्हिड वॉर्नर बनला टायगर श्रॉफ, आलिया भट्ट सोबतचा डान्स VIRL

ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन डेव्हिड वॉर्नर (David Warner) सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. वॉर्नरपूर्वी भारतीय फॅन्ससाठी टिकटॉकवर तेलुगु गाण्यावर व्हिडीओ करत असे. टिकटॉक बंद झाल्यानंतर आता तो फेस स्वॅपच्या (Face Swap) मदतीने व्हिडीओ करतो.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 5 जून : ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन डेव्हिड वॉर्नर (David Warner) सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. वॉर्नर यापूर्वी भारतीय फॅन्ससाठी टिकटॉकवर तेलुगु गाण्यावर व्हिडीओ करत असे. टिकटॉक बंद झाल्यानंतर आता तो फेस स्वॅपच्या  (Face Swap) मदतीने व्हिडीओ करतो. यावेळी त्याने अभिनेता टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) चेहरा लावून व्हिडीओ बनवला आहे. त्याने स्टुडंट ऑफ द इयर - 2 (Student Of The Year -2) या सिनेमातील एका गाण्यावर व्हिडीओ बनवला आहे.

वॉर्नर या व्हिडीओमध्ये आलिया भट (Alia Bhat) सोबत एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. 'खास लोकाग्रहास्तव सादर आहे' असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिले असून यामध्ये वॉर्नरनं #whomami #india #song या टॅगचा वापर केला आहे.

डेव्हिड वॉर्नर आयपीएलच्या 14 व्या सिझनमध्ये (IPL 2021) सनरायझर्स हैदराबाद टीमचा सदस्य होता. त्याच्या कॅप्टनसीमध्ये हैदराबादच्या टीमनं खराब कामगिरी केली. त्यामुळे सिझन सुरु असतानाच वॉर्नरची कॅप्टनसी काढून घेण्यात आली, आणि केन विल्यमसनला कॅप्टन बनवण्यात आले.

डेव्हिड वॉर्नरनं कॅप्टनसीबरोबरच टीममधील जागाही गमावली. आयपीएल स्थगित होण्यापूर्वी झालेल्या हैदराबादच्या मॅचमध्ये वॉर्नर बेंचवर बसला होता. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे आयपीएल स्पर्धा अचानक स्थगित झाली. त्यानंतर वॉर्नर मालदिवमध्ये काही काळ क्वारंटाईन राहून आता ऑस्ट्रेलियाला परतला आहे.

प्रणव धनावडेला 1009 रन काढल्यानंतर सचिननं दिलं होतं खास गिफ्ट

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नरला सध्या विश्रांती दिली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीममध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. आयपीएल स्पर्धेतील उर्वरित 31 सामने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये होणार आहेत. त्या सामन्यांमध्ये वॉर्नर खेळणार की नाही, हे अद्याप अनिश्चित आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, David warner, Tiger Shroff, Video viral