• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 'राहुल द्रविडने तयार केली मॅच विनर्सची फौज, पूर्णपणे बदलली टीम इंडिया'

'राहुल द्रविडने तयार केली मॅच विनर्सची फौज, पूर्णपणे बदलली टीम इंडिया'

टीम इंडिया (Team India) गेल्या काही वर्षांपासून पूर्ण बदलली आहे. मायदेशाप्रमाणे विदेशातही टीम इंडिया विजय मिळवत आहे. हा बदल एका रात्रीमध्ये झालेला नाही.

 • Share this:
  मुंबई, 12 जून :  टीम इंडिया (Team India) गेल्या काही वर्षांपासून पूर्ण बदलली आहे. मायदेशाप्रमाणे विदेशातही टीम इंडिया विजय मिळवत आहे. हा बदल एका रात्रीमध्ये झालेला नाही. यासाठी देशांतर्गत क्रिकेटचे स्वरुप पूर्णपणे बदलले आहे. भारतामध्ये तरुण क्रिकेटपटूंची एक फौज तयार करण्यात आली आहे. त्यांचा शोध घेण्यात आला. त्यामुळेच आज दोन टीम इंडिया तयार झाल्या आहेत. या सर्व बदलांचे श्रेय टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि नॅशनल क्रिकेट अकादमीचे (NCA) अध्यक्ष राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचे आहे. द्रविडनेच गेल्या काही वर्षात पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, शुभमन गिल हे खेळाडू तयार केले आहेत. जे आज टीम इंडियाकडून खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन डेव्हिड वॉर्नर (David Warner) देखील द्रविडमुळे प्रभावित झाला आहे. त्याने 'स्पोर्ट्स टुडे' शी बोलताना भारतीय क्रिकेटमधील बदलामध्ये राहुल द्रविडचे मोठे योगदान असल्याचे सांगितले." द्रविडने मॅच विनर्सची फौज तयार केली आहे. त्यामुळेच भारतीय क्रिकेट बदलले आहे. हे समजून घेण्यासाठी फार मागे जाण्याची गरज नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताने मिळवलेला विजय हे सिद्ध करतो." असे वॉर्नरने सांगितले. Among other things I liked @davidwarner31 crediting Rahul Dravid saying he is the one creating the supply line and that’s what has made a huge diff to this Indian team. — Boria Majumdar (@BoriaMajumdar) June 11, 2021 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर इशांत शर्मा गेला नव्हता.विराट कोहली आणि मोहम्मद शमी पहिल्या टेस्टनंतर बाहेर पडले. तरीही टीम इंडियाने मेलबर्न टेस्ट जिंकून बरोबरी साधली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रविंद्र जडेजा आणि उमेश यादव देखील दोन टेस्ट खेळू शकले नाहीत. तर अश्विन आणि हनुमा विहारी एक टेस्ट खेळले नाहीत. टीम इंडियाचे फक्त दोन खेळाडू संपूर्ण सीरिज खेळले. त्या सीरिजमध्ये पाच खेळाडूंनी पदार्पण केले होते. सलग 6 सिक्सनंतर मैदानात काय घडलं... युवराजनं केला खुलासा 150 खेळाडूंची फौज राहुल द्रविडने नॅशनल क्रिकेट अकादमीतील बॉलिंग कोच पारस म्हांब्रे यांच्या मदतीनं अंडर-16, अंडर-19 खेळाडूंची फौज तयार केली आहे. या गटातील 150 सदस्यांची 6 वेगवेगळ्या गटामध्ये विभागणी केली आहे. त्याचबरोबर प्रत्येक ग्रुपला विभागीय स्तरावर वेगळे प्रशिक्षण दिले जाते. यापैकी 50 खेळाडूंना वेगळे करण्यात आले असून त्यांना नॅशनल कँपमध्ये ट्रेनिंग दिले आहे. या ठिकाणी कोच, ट्रेनर आणि फिजीओ हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आहेत. या सर्व प्रशिक्षणाचा आज टीम इंडियाला फायदा होत आहे.
  Published by:News18 Desk
  First published: