मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

डेव्हिड वॉर्नरनं अक्षय कुमारच्या स्टाईलनं केली 'हेराफेरी' राशिद खानला म्हणाला..

डेव्हिड वॉर्नरनं अक्षय कुमारच्या स्टाईलनं केली 'हेराफेरी' राशिद खानला म्हणाला..

डेव्हिड वॉर्नर (David Warner) क्रिकेट मैदानात असो किंवा नसो तो कायम चर्चेत असतो. वॉर्नर नेहमी सोशल मीडियावर मजेदार व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतो.

  • Published by:  News18 Desk

मुंबई,  14 जुलै : डेव्हिड वॉर्नर (David Warner) क्रिकेट मैदानात असो किंवा नसो तो कायम चर्चेत असतो. वॉर्नर नेहमी सोशल मीडियावर मजेदार व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतो. तो बॉलिवूडचा देखील मोठा फॅन आहे. त्यामुळे अनेकदा त्यामधील प्रसंगाचे फोटो आणि व्हिडीओ एडिट करुन टाकत असतो. वॉर्नरनं एक ताजा फोटो शेअर केला असून त्यामध्ये त्याने अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) स्टाईलची नक्कल केली आहे.

वॉर्नरनं  विनोदी चित्रपट फिर हेरा फेरी  (Phir Hera Pheri) या सिनेमातील अक्षय कुमारच्या स्टाईलमध्ये फोटो शेअर केला आहे. तसेच मी अक्षयपेक्षा चांगली पोझ दिली आहे का? असा प्रश्न त्याने फॅन्सना विचारला आहे. वॉर्नरचा हा फोटो पाहून त्याचा सनरायझर्स हैदराबाद (SRH) टीममधील सहकारी राशिद खान (Rashid Khan) याला हसू आवरलं नाही. त्याने त्यावर तशी प्रतिक्रिया देखील दिली आहे. राशिदची ती प्रतिक्रिया पाहून तू मला का हसत आहेस? असा प्रश्न विचारत वॉर्नरनं त्याची फिरकी घेतली आहे.

डेव्हिड वॉर्नरसह 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी वेस्ट इंडिज आणि बांगलादेशच्या दौऱ्यावरुन माघार घेतली होती. त्यामुळे वॉर्नर आता मैदानात कधी दिसणार याची तारीख नक्की नाही. 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'ने परवानगी दिली तर सप्टेंबर महिन्यात सुरु होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) वॉर्नर खेळण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा अचानक स्थगित करण्यात  आली होती.

ENG vs PAK : इंग्लंडच्या खेळाडूनं टाकला शेन वॉर्नसारखा बॉल, पाकिस्तानचा बॅट्समन थक्क! पाहा VIDEO

आयपीएल स्पर्धेचा पूर्वार्ध वॉर्नरसाठी निराशाजनक ठरला. त्याला सनरायझर्स हैदराबाद टीमच्या (Sunrisers Hyderabad) कॅप्टनसीवरुन हटवण्यात आलं. इतकंच नाही तर प्लेईंग 11 मधूनही वगळण्यात आले होते. आता आयपीएलच्या उत्तरार्धात वॉर्नरला पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याचे आव्हान असेल.

First published:

Tags: Akshay Kumar, Cricket news, David warner, Photo viral