Home /News /sport /

45 वर्षांच्या बॅट्समननं काढले 190 रन, 15 सिक्स आणि 15 फोरचा केला वर्षाव

45 वर्षांच्या बॅट्समननं काढले 190 रन, 15 सिक्स आणि 15 फोरचा केला वर्षाव

7 व्या क्रमांकावर बॅटींगला आलेल्या डॅरेनने (Darren Stevens) आक्रमक खेळ केला. त्याने 7 सिक्सच्या मदतीने 36 ने शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने हा वेग आणखी वाढवत 15 सिक्सच्या मदतीनं 190 रन काढले.

    लंडन, 22 मे : स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये तरुणांना अधिक संधी मिळाली पाहिजे, असे मत नेहमी व्यक्त करण्यात येते. तरुण खेळाडूंमध्ये चांगले खेळण्याची भूक जास्त असते, असा समज आहे. या सर्वांना केंट या इंग्लिश काऊंटी टीमचा ऑल राऊंडर डॅरेन स्टीवन्स (Darren Stevens) याने चुकीचे ठरवले आहे. डॅरेनने वयाच्या 45 व्या वर्षी ग्लेमॉर्गन टीमच्या विरुद्ध  (Kent Vs Glamorgan) आक्रमक खेळी केली. त्याने त्याच्या करियरमधील 36 वे फर्स्ट क्लास शतक झळकवत 190 रन काढले. डॅरेन्सने 190 रन काढण्यासाठी फक्त 149 बॉल खेळले. ज्या पिचवर इतर बॅट्समन्सना रन काढण्यासाठी संघर्ष करावा लागत होता, तिथे त्याने 15 सिक्स आणि 15 फोरचा वर्षाव केला. याचा अर्थ त्याने 150 रन हे फक्त सिक्स आणि फोरच्या मदतीनेच पूर्ण केले. त्याच्या या आक्रमक खेळामुळेच 8 आऊट 128 वरुन केंटने पहिल्या इनिंगमध्ये 307 पर्यंत मजल मारली. केंटच्या टीममध्ये अनेक तरुण बॅट्समनचा समावेश आहे. त्यांची जादू काही चालली नाही. जॅक क्रॉले 0 तर कॅप्टन सॅम बिलिंग्ज 11 रन काढून आऊट झाले. मायकल नेसर आणि गुग्टेन हे देखील झटपट परतले. त्यानंतर 7 व्या क्रमांकावर बॅटींगला आलेल्या डॅरेनने आक्रमक खेळ केला. त्याने 7 सिक्सच्या मदतीने 36 ने शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने हा वेग आणखी वाढवत 15 सिक्सच्या मदतीनं 190 रन काढले. त्याचे द्विशतक 10 रनने हुकले. मार्नस लाबुशेननं त्याला आऊट केले. डेव्हिन्सने मिएगुल कमिन्ससोबत 9 व्या विकेट्ससाठी 166 रनची पार्टरनरशिप केली. यामध्ये कमिन्सचा वाटा फक्त 1 रनचा होता. 2 वर्षांपूर्वी संपणार होते करियर वयाच्या 45 व्या वर्षीही फॉर्मात असलेल्या  डॅरेनचे क्रिकेट करियर 2 वर्षांपूर्वीच संपणार होते. 2019 साली केंट टीमने डॅरेनला कॉन्ट्रॅक्ट वाढवण्यात येणार नाही, अशी सूचना केली होती. त्याचवर्षी डॅरेननं सर्वश्रेष्ठ खेळ केला. त्याने यॉर्करशायर विरुद्ध 225 बॉलमध्ये 237 रन काढले होते. त्याचबरोबर 7 विकेट्सही घेतल्या होत्या. WTC Final : भावा जिंकलंस! प्रतिस्पर्धी असूनही ऋषभ पंतला साहा म्हणाला... डॅरेनने 314 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 16 हजार पेक्षा जास्त रन काढले आहेतय यामध्ये 36 शतक आणि 80 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 514 विकेट्सही घेतल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, England

    पुढील बातम्या