147 किमीच्या वेगाने आलेला चेंडू फलंदाजाने केला गायब; व्हिडिओ होतोय व्हायरल

147 किमीच्या वेगाने आलेला चेंडू फलंदाजाने केला गायब; व्हिडिओ होतोय व्हायरल

एक भन्नाट चेंडू आणि त्यावर मारण्यात आलेला भन्नाट शॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

ब्रिसबेन, 30 ऑक्टोबर: टी-20 मुळे क्रिकेटचा वेग प्रचंड वाढला आहे. फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील टशन प्रत्येक सामन्यात पाहायला मिळते. टी-20 सारख्या प्रकारात फलंदाज गोलंदाजाची लय बिघडवण्यासाठी अनेकवेळा विचित्र शॉट खेळतात. अशाच एक भन्नाट चेंडू आणि त्यावर मारण्यात आलेला भन्नाट शॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

श्रीलंकेचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. ब्रिसबेन येथे झालेल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज बिली स्टॅनलेक (Billy Stanlake)याच्या चेंडूवर श्रीलंकेचा ओपनर दनुष्का गुनातिलका (Danushka Gunathilaka) याने असा काही शॉट मारला की तो चेंडूच गायब झाला आणि पंचांना नवा चेंडू मागवावा लागला. बिलीच्या गोलंदाजीवर दनुष्काने मारलेल्या शॉटमुळे सर्वांनाच हैराण केले. सामन्यातील चौथ्या षटकातील पाचवा चेंडू बिलीने गुड लेंथमध्ये टाकला यावर दनुष्काने चेंडूला फक्त बॅटने स्पर्श करून दिशा दिली. दनुष्काच्या या शॉटमुळे चेंडू थेट सीमेच्या बाहेर गेला. इतक नव्हे तर चेंडू मैदानात हरवला.

बिलाने तो चेंडू 147 किमी वेगाने टाकला होता. ज्यावर दनुष्काने षटकार मारला. चेंडू मैदानाबाहेर जरी गेला नसला तरी तो हरवला त्यामुळे पंचांना सामना सुरु करण्यासाठी नवा चेंडू मागवावा लागला. या शॉटचा व्हिडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे.

षटकाराचा घेतला बदला...

बिलीने दनुष्काने मारलेल्या षटकाराचा बदला पुढील षटकातच घेतला. सहाव्या षटकात बिलीने दुसऱ्याच चेंडूवर दनुष्काला बोल्ड केले. या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी 20 षटकात 117 धावा केल्या.

'जे ठरलंय तेवढंच मिळणार, जास्त मागणी करू नका', भाजप खासदाराचा सेनेला अल्टीमेटम

Published by: Akshay Shitole
First published: October 31, 2019, 7:29 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading