• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • ...तर जसप्रीत बुमराह टेस्टमध्ये 400 विकेट्स घेईल, दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी

...तर जसप्रीत बुमराह टेस्टमध्ये 400 विकेट्स घेईल, दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी

टेस्ट क्रिकेटमध्ये 400 पेक्षा विकेट्स घेण्याची कामगिरी आजवर 10 बॉलर्सनी केली आहे. टीम इंडियाचा मुख्य फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्यामध्ये देखील हा टप्पा पार करण्याची क्षमता आहे.

 • Share this:
  मुंबई, 9 मे: टेस्ट क्रिकेटमध्ये 400 पेक्षा विकेट्स घेण्याची कामगिरी आजवर 10 बॉलर्सनी केली आहे. टीम इंडियाचा मुख्य फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहमध्ये (Jasprit Bumrah)  हा टप्पा पार करण्याची क्षमता आहे, असा विश्वास वेस्ट इंडिजचा माजी फास्ट बॉलर कर्टल अ‍ॅम्ब्रोस (Curtly Ambrose) यांनी व्यक्त केला आहे. वेस्ट इंडिजच्या महान फास्ट बॉलर्समध्ये अ‍ॅम्ब्रोसचा समावेश होता. आजही क्रिकेट विश्वात त्याचं नाव आदरानं घेतलं जातं. अ‍ॅम्ब्रोस स्वत: बुमराहचा जबरदस्त फॅन आहे. अ‍ॅम्ब्रोसनं एका यूट्यूब कार्यक्रमात बोलताना बुमराहची प्रशंसा केली. "भारताकडं काही चांगले फास्ट बॉलर्स आहेत. बुमराह त्यामध्ये खास आहे. मी जितके बॉलर्स बघितले आहेत, त्यामध्ये बुमराह सर्वात वेगळा आहे. तो अत्यंत प्रभावशाली बॉलर आहे. त्यानं आगामी काळात आणखी चांगली कामगिरी करावी असं मला वाटतं," असं त्यानं सांगितलं. वेस्ट इंडिजच्या माजी फास्ट बॉलर्सला बुमराह टेस्ट क्रिकेटमध्ये 400 विकेट्स घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी "तो फिट असेपर्यंतच क्रिकेट खेळू शकेल. बॉल चांगला स्विंग करेल आणि प्रभावी यॉर्कर टाकेल. त्याच्या बॉलिंगमध्ये विविधता आहे. तो जास्त काळ खेळला तर सहज 400 विकेट्सचा टप्पा पूर्ण करेल, अशी मला खात्री आहे." असं अ‍ॅम्ब्रोसनं सांगितलं. फिट राहणे आवश्यक अ‍ॅम्ब्रोसनं 12 वर्षांच्या कारकिर्दीत 98 टेस्टमध्ये 405 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं बुमराहबद्दल बोलताना सांगितलं, "बुमराहचा रन अप छोटा असल्यानं त्याचा शरिरावर जास्त ताण येतो. तो स्वत:ला जितकं फिट ठेवेल तितकं त्याचं करियर लांब असेल. फास्ट बॉलर्ससाठी तो लयमध्ये असणे आवश्यक असते. बुमराह फिट राहिला तर त्याला जास्त काळ टेस्ट क्रिकेट खेळण्यास कोणतीही अडचण येणार नाही." 19 वर्षांनंतर मिळाली देशाकडून खेळण्याची संधी, पहिल्याच ओव्हरमध्ये केला रेकॉर्ड बुमराहची टेस्ट कारकिर्द बुमराहनं 2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तो आजवर 19 टेस्ट खेळला असून त्यामध्ये त्यानं 22.10 च्या सरासरीनं 83 विकेट्स घेतल्या आहेत. एका टेस्टमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरी त्यानं पाच वेळा केली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: