मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

धोनीच्या रिटायरमेंटच्या दिवशी काय घडलं? जवळच्या सहकाऱ्यानं सांगितला 'तो' अनुभव

धोनीच्या रिटायरमेंटच्या दिवशी काय घडलं? जवळच्या सहकाऱ्यानं सांगितला 'तो' अनुभव

महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याने मागच्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर होत असल्याची घोषणा केली. धोनीनं ही घोषणा केली त्यावेळी तो चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) सराव शिबिरामध्ये उपस्थित होता.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 5 जून : दिग्गज भारतीय क्रिकेटपटू आणि वर्ल्ड कप विजेत्या टीमचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याने मागच्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर होत असल्याची घोषणा केली. धोनीनं ही घोषणा केली त्यावेळी तो चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) सराव शिबिरामध्ये उपस्थित होता. त्या दिवशी धोनीसोबत असलेला त्याचा सीएसकेचा सहकारी ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने 10 महिन्यांपूर्वीचा तो अनुभव सांगितला आहे.

कसा होता तो दिवस?

ऋतुराजने सांगितले की, "त्या दिवशी आम्ही दुबईला जाणार होतो. आम्ही 10-15 खेळाडू धोनीसोबत सराव करत होतो. पण धोनीनं याबाबत आम्हाला काहीही कल्पना दिली नव्हती. 15 ऑगस्टचा दिवस देखील नेहमीसारखाच होता. मला आणि सीएसकेच्या अन्य खेळाडूंना सोशल मीडियाच्या माध्यमातूनच धोनी रिटायर झाल्याचं समजलं. आमचा सराव संध्याकाळी साडेसहाच्या आसपास संपला. साधारण 7 वाजता माही भाई सोडून बाकी सर्व जण डिनरसाठी एकत्र बसलो होतो. त्यावेळी कुणीतरी इनस्टाग्राम पाहून मला सांगितलं की, धोनीनं रिटायर होत असल्याची घोषणा केली आहे.

त्यावेळी काहीही वेगळं वाटत नव्हतं. काहीही बोलणे नाही, चर्चा नाही. कोणताही संकेत नाही. हे सर्व घडणार आहे याची कुणालाही कल्पना नव्हती. धोनी रिटायर झाल्याचं समजल्यावर कुणाचीही याबाबत धोनीला विचारण्याची हिंमत झाली नाही." असा अनुभव ऋतुराजनं सांगितला आहे.

ऋतुराज पुढे म्हणाला की, "धोनी रिटायर झाल्याचं समजल्यावर तो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार नाही, हा विचार माझ्या मनात आला. या गोष्टीची सवय होण्यासाठी मला दोन-तीन दिवस लागले."

IPL 2021 : स्पर्धा पूर्ण करण्यासाठी BCCI ची कसरत, वेळापत्रकात करणार मोठा बदल

ऋतुराजनं हा आयपीएल सिझन (IPL 2021) स्थगित होण्यापूर्वी 7 मॅचमध्ये एकूण 196 रन काढले आहेत. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने आयपीएल कारकिर्दीमध्ये एकूण 13 मॅच खेळल्या असून यामध्ये 5 अर्धशतकाच्या मदतीनं 400 रन केले आहेत.

First published:

Tags: Cricket, Csk, MS Dhoni