मुंबई, 21 ऑक्टोबर: जगातील सर्वात लोकप्रिय फुटबॉल क्लब आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोची (Cristiano Ronaldo) फुटबॉल टीम असलेल्या मँचेस्टर युनायटेडची (Manchester United) आयपीएलमध्ये एन्ट्री होण्याची चिन्हं आहेत. आगामी आयपीएलमध्ये (IPL 2022) दोन नव्या टीमची एन्ट्री होणार आहे. या टीमच्या खरेदीसाठी मँचेस्टर युनायटेचे मालक असलेल्या ग्लेजर परिवारानं रस दाखवला आहे.
'टाईम्स ऑफ इंडिया' मधील वृत्तानुसार मँचेस्टर युनायटेड टीमचे मालकांना जगातील सर्वात मोठ्या टी20 लीगमध्ये रस आहे. त्यांनी नव्या टीमची बोली जिंकली तर आयटीटीच्या (ITT) नियमानुसार भारतामध्ये एका कंपनीची स्थापना करावी लागेल. याबाबत एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मँचेस्टर युनायटेडनं विदेशी गुंतवणूकदारांसाठी असलेली अट पूर्ण केली तर ते लिलावासाठी पात्र ठरतील.
'या प्रकाराबाबत आम्हाला काहीही माहिती नाही, पण आमच्या मालकांना आयपीएलमध्ये रस आहे हे आम्हाला माहिती आहे,' अशी माहिती युनायटेडच्या सूत्रांनी दिली आहे.
T20 World Cup: IPL मध्ये दुर्लक्ष केलेला बॉलर ठरला हिट, 4 ओव्हर्समध्ये फक्त 2 रन देत घेतल्या 3 विकेट्स
2 टीमसाठी 12 जणांनी घेतले टेंडर
आयपीएलच्या लिलावाबाबत यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार 2 टीमसाठी 12 जणांनी टेंडर विकत घेतले आहे. 2 हजार कोटी रुपयांची बेस प्राईज ठेवल्यानंतरही टेंडर विकत घेण्यासाठी अनेक जण रस दाखवत असल्यामुळे बीसीसीआयनेही आश्चर्य व्यक्त केलं आहे.
आरपीएसजी ग्रुपचे संजीव गोयंका, ऑरोबिंदो फार्मा, टोरेंट फार्मास्युटिकल्स, ब्रॉडकास्ट ऍण्ड स्पोर्ट्स कन्सलटिंग एजन्सीज आयटीडब्ल्यू, ग्रुप एम, सिंगापूरची प्रायव्हेट इक्विटी फर्म आणि इतर काही कंपन्यांनी टेंडर विकत घेतली आहेत. आता या सर्वांमध्ये मँचेस्टर युनायटेडनंही एन्ट्री घेतल्यानं नव्या टीमच्या लिलावातील चुरस वाढली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.