मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

कपिल देव यांच्या तब्येतीसाठी दिग्गजांनी केली प्रार्थना

कपिल देव यांच्या तब्येतीसाठी दिग्गजांनी केली प्रार्थना

भारताला पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या कपिल देव (Kapil Dev) यांना हृदयविकाराचा झटका आला आहे

  • Published by:  Shreyas

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : भारताला पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या कपिल देव (Kapil Dev) यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा कपिल देव यांच्या छातीत दुखायला लागलं. यानंतर त्यांना दिल्लीच्या एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर एन्जियोप्लास्टी करण्यात आली. कपिल देव यांच्या तब्येतीसाठी सगळेच जण प्रार्थना करत आहेत. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सुरेश रैना, शिखर धवन यांनीही कपिल देव यांना लवकर बरं वाटावं, अशी प्रार्थना केली आहे.

कपिल देव यांना लवकर बरं वाटावं, म्हणून प्रार्थना. पाजी लवकर बरे व्हा, असं ट्विट सचिन तेंडुलकरने केलं आहे.

तुमच्या चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना करतो, पाजी लवकर बरे व्हा, असं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला आहे.

कपिल देव यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असं शिखर धवन म्हणाला आहे.

कपिल देव यांचा मित्र मदनलाल यांनीही याबाबत ट्विट केलं आहे. ज्यांनी माहिती घेण्यासाठी फोन केला, त्यांच्या प्रार्थना कुटुंबापर्यंत पोहोचवल्या आहेत, कपिल मजबूत राहा, असं मदनलाल म्हणाले.

कपिल देव यांनी भारतासाठी 131 टेस्ट आणि 225 वनडे खेळल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये 400 पेक्षा जास्त विकेट (434) आणि 5 हजारपेक्षा जास्त रन करणारे कपिल देव एकमात्र खेळाडू आहेत. 2010 साली आयसीसीने कपिल देव यांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला.

First published: