नवी दिल्ली, 15 जून: भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी होणाऱ्या आयसीसी वर्ल्डकपमधील सामन्यासाठी संपूर्ण क्रिकेट जगत सज्ज झाले आहे. वर्ल्डकपमधील सर्वात महत्त्वाचा सामना मानला जात आहे. सामन्यातील सर्व तिकीटांची विक्री झाली असून अनेकांनी विजयाचा दावेदार कोण याचे अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. अनेक जण आता देखील तिकीटासाठी हवी तितकी रक्कम देण्यास तयार आहेत. टिव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या जाहीरातींचा दर हा 10 सेंकदासाठी 35 लाख रुपये इतका झाला आहे. भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघामधील सामन्यासाठी या दोन्ही देशातील चाहत्यांनी जितकी वाट पाहिली तितकी वाट आणखी एका देशाने पाहिली आहे. हा देश म्हणजे अफगाणिस्तान होय.
वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तान देखील खेळत आहे. पण त्यांच्या सामन्यावर पावसाचे सावट राहिले. या सर्वात अफागाण चाहते वाट पाहत आहेत ती भारत-पाकिस्तान सामन्याची. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानमधील क्रिकेटचे चाहते या सामन्यात भारताला पाठिंबा देत आहेत. अधिकतर अफगाण चाहत्यांना विराट कोहली आणि एम.एस.धोनी हे भारताच्या विजयाचे मुख्य भाग असतील असे वाटते. राजधानी काबूलमध्ये अनेक दुकानांच्या बाहेर रविवार होणाऱ्या सामन्यासाठी तयारी करण्यात आली आहे. ऐजाझ खान या क्रिकेट चाहत्याने सांगितले की, धोनी माझा आवडता खेळाडू आहे. तो कुल आहे आणि नेतृत्व देखील चांगले करतो. संपूर्ण संघाला त्याचे मार्गदर्श मिळत असते. याआधी पाकिस्तानच्या संघात देखील चांगले खेळाडू होते. पण आता तसे कोणी राहिले नाही.
वाचा-अनुपमानं केला बुमराहसोबतच्या नात्याचा उलगडा!
मोहम्मद रफीक या चाहत्याने तो भारताचा समर्थक असल्याचे सांगितले. भारताचा संघ चांगली कामगिरी करत आहे. विराट कोहली, धोनी आणि जसप्रीत बुमराह सारखे दर्जेदार खेळाडू आहेत. पण पाकिस्तानकडे असा एकही खेळाडू नाही. त्यामुळेच या सामन्यात भारतच जिंकले असे रफीक म्हणाला.
अर्थात अफगाणिस्तानमधील काही चाहते पाकिस्तानला देखील पाठिंबा देत आहेत. या दोन्ही संघाच्या सामन्यात सर्वोत्तम क्रिकेट पाहायला मिळते. पण भारताच्या विजयावर आम्हाला जास्त आनंद होतो. पाकिस्तानने वर्ल्डकपमध्ये कधीच भारताला पराभूत केलं नाही. त्यांच्याकडे चांगला संघ असताना ते का जिंकत नाहीत हेच कळत नाही, असे शहशाह या चाहत्याने सांगितले.
उदयनराजेंची नक्कल करून रामराजेंनी उडवली खिल्ली, VIDEO व्हायरल