लॉर्ड्स, 14 जुलै: क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर आज ICC Cricketw world cup 2019चा विजेता ठरणार आहे. एका बाजूला 6 कोटी लोकसंख्येचा देश तर दुसऱ्या बाजूला केवळ 50 लाख लोकसंख्या असलेला देश. एक देश क्रिकेटचा जनक तर दुसऱ्याचा राष्ट्रीय खेळ रग्बी... दीड महिन्यापूर्वी वर्ल्ड कपची सुरुवात झाल्यानंतर अनेकांनी कल्पनाही केली नसले की विजेतेपदासाठी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होईल. साखळी फेरीतून गुणतक्त्यात तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेले संघ अंतिम फेरीत पोहोचले असून यंदाची अंतिम लढत ही ऐतिहासिक अशी ठरणार आहे. वर्ल्ड क्रिकेटच्या इतिहासात 29 वर्षानंतर अशी फायनल होणार आहे ज्यातून क्रिकेटविश्वाला नवा विजेता मिळेल. या दोन्ही संघांनी आतापर्यंत विश्वचषक जिंकलेला नाही. त्यामुळे जो संघ जिंकेल तो इतिहास घडवेल.
इंग्लंडमध्ये गेल्या 45 दिवासांपासून सुरु झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमधील 47 सामन्यांनंतर आज विजेतेपदासाठी लढत होत आहे. क्रिकेटच्या या सर्वोच्च स्पर्धेवर ज्यांनी आजपर्यंत कब्जा मिळवला त्यांना मागे टाकून दोन नवे संघ अंतिम फेरीत पोहोचले आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या पंढरीत एक नवा विजेता कोण असेल याची सर्वांना उत्सुकता आहे. याआधी झालेल्या 11 विश्वचषकाचे विजेतेपद 5 देशांनी मिळवले आहे. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 5 वेळा त्यापाठापाठ भारत, वेस्ट इंडिज यांनी प्रत्येकी दोन वेळा. तर श्रीलंका आणि पाकिस्तान यांनी प्रत्येकी एक वेळा विजेतेपद मिळवले आहे.
'पराभवानंतर जडेजा रडला, सतत एकच वाक्य बडबडत होता'
अशी आहे लॉर्ड्सची खेळपट्टी
वर्ल्ड कपमधील लॉर्ड्स मैदानाचा इतिहास पाहता जो संघ प्रथम फलंदाजी करतो त्याला फायदा होतो. तसेच पहिला फलंदाजी करणारा संघ 300 पेक्षा जास्त धावा करतो. पण अंतिम सामन्यासाठी नव्या खेळपट्टीचा वापर केला जाणार आहे. नवी खेळपट्टीवर काही प्रमाणात गवत दिसत आहे त्यामुळे ही खेळपट्टी गोलंदाजांना मदत मिळेल असे मानले जाते.
2️⃣ brilliant sides
2️⃣ blistering openers
1️⃣ big game
Are you ready? 😍 #NZvENG | #CWC19 pic.twitter.com/XYARECV9Yc
— ICC (@ICC) July 13, 2019
नाणेफेक महत्त्वाची ठरणार?
स्पर्धेत आतापर्यंत जेव्हा जेव्हा इंग्लंडने धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा तेव्हा त्यांचा डाव कोसळला आहे. त्यामुळेच नाणेफेक जिंकून इंग्लंड प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभा करण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड देखील प्रथम फलंदाजीसाठी प्रयत्न करेल. अशा परिस्थितीत नाणेफेक महत्त्वाची ठरेल यात शंका नाही.
कोण किती मजबूत
इंग्लंड- यजमान संघाची सर्वात मजबूत बाजू कोणती असेल तर ती त्यांची फलंदाजी होय. मोठी धावसंख्या करण्यात इंग्लंडला शक्य आहे. आघाडी, मधली फळी आणि त्यानंतर फलंदाजी करणारे खेळाडू असल्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभा करता येऊ शकते. न्यूझीलंडच्या गोलंदाजापासून पहिली 15 षटके जर सावध खेळ केला तर अर्धी लढाई इंग्लंड तिथेच जिंकले. त्यासाठी इंग्लंडच्या सलामीवीर जेसन रॉ आणि जॉनी बेयरस्टो यांना सावध सुरुवात करावी लागेल. एकदा का मोठी धावसंख्या केली की जोफ्रा आर्चर, ख्रिस वोक्स आणि बेन स्टोक्स हे गोलंदाज त्यांची जबाबदारी चोख पार पाडतील.
न्यूझीलंड- इंग्लंडच्या तुलनेत न्यूझीलंडचा संघ कमकूवत वाटत असला तरी यजमानांसाठी फायनल तितकी सोपी असणार नाही. न्यूझीलंड सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचला आहे. गोलंदाजी ही त्यांची सर्वात जमेची बाजू आहे. भारताविरुद्धच्या सेमीफायनमध्ये गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीमुळेच त्यांनी विजय मिळवला. पण त्यांनी वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर इंग्लंडच्या धारधार गोलंदाजीपासून त्यांना बचाव करावा लागले.
उन्ह पडलं तर इंग्लंड, ढगाळ वातावरण असेल तर न्यूझीलंड
आज होणाऱ्या अंतिम लढतीत क्रिकेटविश्वाला नवा विजेता मिळणार आहे. 23 वर्षानंतर प्रथमच दोन संघ पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकतील. याआधी 1996च्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेच्या संघाने प्रथम विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 4 वेळ तर भारताने एकदा वर्ल्ड कप जिंकला होता. लॉर्ड्सची खेळपट्टी पाहता जर उन्ह पडले तर त्याच फायदा इंग्लंडला होऊ शकतो कारण पिच सपाट असेल. या उलट खेळपट्टीत दव असेल आणि वातावरण ढगाळ असेल तर त्याचा फायदा न्यूझीलंडला होईल आणि ते विजेते होतील.
29 वर्षानंतर होणार असे...
वर्ल्ड कपमध्ये 29 वर्षानंतर असे होत आहे की एकदा ही वर्ल्ड कप न जिंकलेले दोन संघ अंतिम फेरीत आले आहेत. याआधी 1922च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम लढत झाली होती. तेव्हा ही त्या दोन्ही संघांनी विजेतेपद मिळवले नव्हते. 1992साली इंग्लंडचा पराभव करून पाकिस्तानने विजेतपद मिळवले होते.
असा आहे इतिहास
दोन्ही संघात आतापर्यंत 90 सामने झाले आहेत. त्यापैकी इंग्लंडने 41 तर न्यूझीलंडने 43 सामने जिंकले आहेत.
VIDEO: 60 वर्षीय व्यक्तीची बॅग पळवणाऱ्या चोराला महिला ट्रॅफिक पोलिसाने पकडले