दुबई, 5 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या (T20 World Cup 2021) सेमी फायनलमध्ये पोहचण्याची टीम इंडियाची आशा अजूनही कायम आहे. भारतानं शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये स्कॉटलंडचा (India vs Scotland) फक्त 39 बॉलमध्ये पराभव केला. या विजयानंतर टीम इंडिया ग्रुप 2 मध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडनंतर तिसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. टीम इंडियाचे आता 4 मॅचमध्ये 2 विजय आणि 2 पराभवासह 4 पॉईंट्स आहेत.
स्कॉटलंडनं दिलेलं 86 रनचं आव्हान टीम इंडियाने 6.3 ओव्हरमध्येच पार केलं. एवढ्या मोठ्या विजयामुळे टीम इंडियाच्या नेट रनरेट चांगलाच सुधारला आहे. ग्रुपमधला सर्वोत्तम रनरेट करण्यासाठी स्कॉटलंडने दिलेलं 86 रनचं आव्हान टीम इंडियाला 7.1 ओव्हरमध्ये पार करणं गरजेचं होतं, पण भारताने हे आव्हान 4 बॉल आधीच म्हणजे 6.3 ओव्हरमध्ये पार केलं. यामुळे भारताचा नेट रनरेट आता +1.619 एवढा झाला आहे.केएल राहुल (KL Rahul) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या जोडीनं आक्रमक सुरूवात केल्यानं टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवला.
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली, व्हाईस कॅप्टन रोहित शर्मा यांच्यासह अनेक खेळाडूंनी स्कॉटलंडच्या ड्रेसिंग रूमला (Virat Kohli in Scotland Dressing Room) भेट दिली. क्रिकेट स्कॉटलंडनं याचे फोटो त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर केले आहेत. या फोटोमध्ये विराट आणि रोहित काही टिप्स देत असून स्कॉटलंडचे खेळाडू त्यांचं बोलणं काळजीपूर्वक ऐकत आहेत. 'विराट, आमच्यासाठी वेळ काढल्याबद्दल खूप आदर' असं कॅप्शन क्रिकेट स्कॉटलंडनं या फोटोंना दिलं आहे.
Huge respect to @imVkohli and co. for taking the time pic.twitter.com/kdFygnQcqj
— Cricket Scotland (@CricketScotland) November 5, 2021
या मॅचमध्ये विराट कोहलीनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताने स्कॉटलंडला 85 रनवर ऑल आऊट केले. मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराहला 2 विकेट घेण्यात यश आलं. 15 रन देऊन 3 विकेट्स घेणाऱ्या जडेजाला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
T20 World Cup: अफगाणिस्तान हरलं तर काय करणार... रविंद्र जडेजानं दिलं रोखठोक उत्तर! VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup, Team india