Home /News /sport /

BAN vs PAK : पाकिस्तानच्या 'गब्बर' ने केली बांगलादेशची शिकार, टीम विजयाच्या मार्गावर

BAN vs PAK : पाकिस्तानच्या 'गब्बर' ने केली बांगलादेशची शिकार, टीम विजयाच्या मार्गावर

पाकिस्ताननं बांगलादेश विरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्टवर (BAN vs PAK) पकड मिळवली आहे.मॅचच्या पाचव्या दिवशी बुधवारी बांगलादेशची पहिली इनिंग फक्त 87 रन काढून ऑल आऊट झाली.

    मुंबई, 8 डिसेंबर : पाकिस्ताननं बांगलादेश विरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्टवर (BAN vs PAK) पकड मिळवली आहे. पावसामुळे या टेस्टचा जवळपास 3 दिवसांचा वेळ वाया गेला. मॅचच्या पाचव्या दिवशी बुधवारी बांगलादेशची पहिली इनिंग फक्त 87 रन काढून ऑल आऊट झाली. पाकिस्ताननं पहिल्या इनिंगमध्ये 300 रन केले होते. त्यांना पहिल्या इनिंगमध्ये 213 रनची आघाडी मिळाली. त्यानंतर पाकिस्तानने बांगलादेशला 'फॉलो ऑन' दिला आहे. दुसऱ्या इनिंगमध्येही बांगलादेशची सुरूवात खराब झाली आहे. बांगलादेशनं दुसऱ्या दिवशी 7 आऊट 76 या मंगळवारच्या स्कोअरवरुन पुढे खेळण्यास सुरूवात केली. त्यांची पूर्ण टीम फक्त 32 ओव्हर्समध्ये 87 रन देऊन ऑल आऊट झाली. पाकिस्तानकडू ऑफ स्पिनर साजीद खानने (Sajid Khan) 42 रन देत 8 विकेट्स घेतल्या. ही कोणत्याही पाकिस्तानी बॉलर्सची टेस्टमधील चौथ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी आहे. विशेष म्हणजे साजिदने यापूर्वी 3 टेस्टमध्ये 444 रन देत फक्त 6 विकेट्स घेतल्या होत्या. गब्बरसारखी स्टाईल बांगलादेश विरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये 8 विकेट्स घेणारा साजीद टीम इंडियाा 'गब्बर' म्हणजेच शिखर धवनची (Shikhar Dhawan) स्टाईल कॉपी करतो. माजीद विकेट घेतल्यानंतर स्वत:ची मांडी थोपटतो. ही धवनची स्टाईल आहे. धवनची स्टाईल कॉपी केलेला माजीदचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, बांगलादेशची दुसऱ्या इनिंगमध्येही सुरूवात खराब झाली. लंचपर्यंत त्यांचा स्कोअर 4 आऊट 72 झाला होता. आता उर्वरित दोन सेशनमध्ये ही मॅच वाचवण्याचे त्यांना आव्हान आहे. दक्षिण आफ्रिकेत भारतीय बॅटरची कमाल, अजिंक्य रहाणेची जागा घेण्यासाठी सज्ज
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bangladesh, Cricket, Pakistan

    पुढील बातम्या