Home /News /sport /

IND vs ENG: पहिल्या टेस्टपूर्वी विराटचं टेन्शन गेलं, अनुभवी बॉलरला गवसला फॉर्म

IND vs ENG: पहिल्या टेस्टपूर्वी विराटचं टेन्शन गेलं, अनुभवी बॉलरला गवसला फॉर्म

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखाली आजवर इंग्लंडमध्ये टेस्ट मालिका (India vs England) जिंकता आलेली नाही. त्यामुळे विराटसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. पहिल्या टेस्टपूर्वी टीम इंडियाचा अनुभवी बॉलर फॉर्मात आल्यानं विराटचं टेन्शन दूर झालं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 22 जुलै: भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पाच टेस्टची मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होत आहे. भारतीय क्रिकेट टीमला विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखाली आजवर इंग्लंडमध्ये टेस्ट मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे विराटसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. या मालिकेतील पहिल्या टेस्टपूर्वी टीम इंडियाचा  अनुभवी बॉलर फॉर्मात आल्यानं विराटचं टेन्शन दूर झालं आहे. टीम इंडियाची सध्या काऊंटी सिलेक्ट इलेव्हनविरुद्ध तीन दिवसांची प्रॅक्टीस मॅच सुरू आहे. या मॅचच्या दुसऱ्या दिवशी अनुभवी बॉलर उमेश यादवनं (Umesh Yadav) जोरदार बॉलिंग केली. उमेशनं 22 रन देत तीन विकेट्स घेतल्या. त्यामुळे टीम इंडियाच्या 311 रनला उत्तर देताना काऊंटी सिलेक्ट इलेव्हनची दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस 9 आऊट 220 अशी अवस्था झाली आहे. उमेशनं कॅप्टन विल रोड्सला (11) बोल्ड केले. तर लिंडन जेम्स (27) आऊट करत हमीदबरोबरची त्याची पाचव्या विकेटसाठी झालेली 75 रनची पार्टनरशिप तोडली.  इंग्लंडच्या टीममध्ये निवड झालेला ओपनिंग बॅट्समन हसीब हमीद याने शतक केलं. हसीबनं 112 रन काढले. त्याला शार्दूल ठाकूरनं आऊट केल. भारताकडून उमेशनं 3, सिराजनं 2 तर बुमराह, शार्दूल, जडेजा आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी एक विकेट घेतली. IND vs SL: 'श्रीलंकेला ‘ती’ चूक भोवली,’ निराश मुरलीधरनची पराभवानंतर प्रतिक्रिया या प्रॅक्टीस मॅचमध्ये उमेशसह मोहम्मद सिराज आणि खराब फॉर्मात असलेल्या जसप्रीत बुमराहनं देखील चांगली बॉलिंग केली. यापूर्वी दुसऱ्या दिवशी सकाळी भारताची पहिली इनिंग 311 रनवर संपुष्टात आली. भारताकडून केएल राहुलनं (KL Rahul) सर्वाधिक 101 रन काढले. तर रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) 75 रनची खेळी केली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India vs england, Virat kohli

    पुढील बातम्या