मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

रन काढताना खाली पडलेल्या बॅट्समनला बॉलरनं केलं Troll, VIDEO VIRAL

रन काढताना खाली पडलेल्या बॅट्समनला बॉलरनं केलं Troll, VIDEO VIRAL

इंग्लंडमधील कांऊटी चॅम्पियनशीप (county championship) स्पर्धेतील मिडलसेक्स आणि हॅम्पशायर यांच्यात झालेल्या मॅचमध्ये ही घटना घडली आहे.

इंग्लंडमधील कांऊटी चॅम्पियनशीप (county championship) स्पर्धेतील मिडलसेक्स आणि हॅम्पशायर यांच्यात झालेल्या मॅचमध्ये ही घटना घडली आहे.

इंग्लंडमधील कांऊटी चॅम्पियनशीप (county championship) स्पर्धेतील मिडलसेक्स आणि हॅम्पशायर यांच्यात झालेल्या मॅचमध्ये ही घटना घडली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 19 मे: 'जंटलमन्स गेम' अशी क्रिकेटची ओळख आहे. मात्र अनेकदा क्रिकेटपटूंच्या मैदानावरील वर्तनातून या भावनेला धक्का बसतो. खेळाडूंमधील वाद, बाचाबाची, स्लेजिंग हे आता क्रिकेटचे भाग बनले आहेत. त्याचवेळी काही वेळा खेळाडू भर मैदानात इतरांची थट्टा करतात. त्यावेळी त्यानं केलेली थट्टा ही योग्य आहे? यावर चर्चा सुरु होते. इंग्लंडमधील कांऊटी चॅम्पियनशीप (county championship) स्पर्धेतील मिडलसेक्स आणि हॅम्पशायर यांच्यात झालेल्या मॅचमध्ये याच प्रकारची एक घटना घडली आहे.

लॉर्ड्सवर झालेल्या या मॅचमध्ये मिडलेक्सच्या निक गुबिन्स यानं अर्धशतक झळकावले. या खेळीच्या दरम्यान हॅम्पशायरचा फास्ट बॉलर केथ बार्कर यानं त्याला मैदानात ट्रोल (Troll) केले. या गोष्टीचा काही फॅन्सनी एक विनोद म्हणून आनंद घेतला. तर बार्करनं ही कृती करणे योग्य नाही, असं मत काही फॅन्सनं व्यक्त केले आहे.

काय घडला प्रसंग?

या मॅचमध्ये निक रन काढताना नॉन स्ट्रायकर एंडला खाली पडला. यावेळी त्याला उठण्यासाठी मदत म्हणून बार्करनं हात पुढे केला. मात्र त्याच्या डोक्यात काही तरी वेगळंच सुरु होतं. निकनं बार्करला प्रतिसाद म्हणून हाथ पुढे केला. त्यावेळी बार्करनं हात मागे घेतला आणि तो पुढे निघून गेला. 'द ग्रेड क्रिकेटर'  या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडीओ (VIDEO) शेअर करण्यात आला आहे.

‘पुढील 3 जन्म ‘हे’ काम करायचं आहे,’ सौरव गांगुलीनं सांगितली ‘मन की बात’

निकनं या इनिंगमध्ये 51 रन काढले. मिडलसेक्सनं पहिल्यांदा बॅटींग करताना 172 रन काढले. त्याला उत्तर देताना हॅम्पशायरनं 208 पर्यंत मजल मारली. बार्करनं आठव्या क्रमांकावर येत 84 रनची शानदार खेळी केली. मिडलसेक्सला दुसऱ्या इनिंगमध्येही कमबॅक करता आलं नाही. त्यांना दुसरी इनिंग 101 रन काढता आले. हॅम्पशायरनं 66 रनचं टार्गेट 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले.

First published:

Tags: Cricket, Social media viral, Video, Video Viral On Social Media