IPL 2021 : ‘देश सर्वप्रथम’ दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूचा मोठा निर्णय!

IPL 2021 : ‘देश सर्वप्रथम’ दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूचा मोठा निर्णय!

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धा खेळता यावी म्हणून राष्ट्रीय टीममधून माघार घेणाऱ्या खेळाडूंची संख्या कमी नाही. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) कागिसो रबाडानं (Kagiso Rabada) हा ट्रेंड मोडणारा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 19 फेब्रुवारी : इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धा खेळता यावी म्हणून राष्ट्रीय टीममधून माघार घेणाऱ्या खेळाडूंची संख्या कमी नाही. बांगलादेशच्या शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) कोलकाता नाईट रायडर्समध्ये (KKR)  निवड होताच श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) कागिसो रबाडानं (Kagiso Rabada) हा ट्रेंड मोडणारा निर्णय घेतला आहे.

रबाडा हा दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capotals) सर्वात महत्त्वाचा बॉलर आहे. मागच्या वर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत (IPL 2020) त्यानं सर्वात जास्त 30 विकेट्स घेतल्या होत्या. डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी तो ओळखला जातो. या 30 पैकी 28 विकेट्स त्यानं डेथ ओव्हरमध्ये घेतल्या आहेत.

आयपीएलमधील यशस्वी बॉलर्सपैकी एक असलेल्या रबाडानं या स्पर्धेपेक्षा देशाला प्राधान्य दिलं आहे. आयपीएल स्पर्धेच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नाहीत. मात्र ही स्पर्धा एप्रिल महिन्यात सुरु होणार हे स्पष्ट आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील चार टी-20 आणि 3 वन-डे मॅचची मालिका 2 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान होणार आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धा एक आठवडा न खेळता राष्ट्रीय टीमकडून खेळणं हे आपलं पहिलं प्राधान्य असेल असं रबाडानं स्पष्ट केलं आहे.

(हे वाचा :  केकेआरच्या ‘या’ खेळाडूची देशासाठी खेळण्यापेक्षा आयपीएलला पसंती, कसोटी मालिकेतून माघार )

काय म्हणाला रबाडा?

‘देश नेहमी पहिल्यांदा आहे. पाकिस्तान मालिकेमुळे मी कदाचित आयपीएल स्पर्धेतील पहिल्या आठवड्यात खेळणार नाही. दिल्ली हे माझं भारतामधील घर आहे मात्र राष्ट्रीय कर्तव्याला माझं प्राधान्य आहे.’’ असं रबाडानं एका वेबसाईटशी बोलताना स्पष्ट केले आहे.

दिग्गजांना टाकलं मागं

पाकिस्तान विरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत रबाडानं 200 विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला. रबाडाने हा विक्रम 44व्या टेस्टमध्येच केला. सगळ्यात कमी वयात 200 विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये रबाडा चौथ्या क्रमांकावर आहे. वकार युनूसने 24 वर्ष 26 दिवस, कपिल देव यांनी 24 वर्ष 28 दिवस, हरभजन सिंगने 25 वर्ष 74 दिवस आणि रबाडाने 25 वर्ष 248 दिवसांमध्ये हा विक्रम केला आहे.  रबाडाने इम्रान खान, कर्टली एम्ब्रॉज आणि ग्लेन मॅक्ग्रा यांच्यासारख्या दिग्गजांना मागे टाकलं आहे.

Published by: News18 Desk
First published: February 19, 2021, 1:53 PM IST

ताज्या बातम्या