VIDEO : 'मी निवृत्ती घेतलीच नाही', गेलचा धक्कादायक खुलासा

VIDEO : 'मी निवृत्ती घेतलीच नाही', गेलचा धक्कादायक खुलासा

भारताविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना गेलचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना म्हणत अनेकांनी त्याला पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

  • Share this:

त्रिनिदाद, 15 ऑगस्ट : वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलनं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 72 धावांची वेगवान खेळी केली. वर्ल्ड कपदरम्यान त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली होती. भारताविरुद्धच्या मालिकेनंतर आपण निवृत्त होणार असल्याचंही गेलनं म्हटलं होतं. आता मात्र त्याच्या निवृत्तीच्या चर्चेला वेगळीच रंगत आली आहे. सामन्यानंतर त्याला निवृत्तीबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा गेल म्हणाला की, मी अजुन निवृत्ती जाहीर केलेली नाही. पुढच्या नोटीसीपर्यंत मी खेळत राहीन असं उत्तर गेलनं दिलं.

गेलनं 41 चेंडूत 72 धावांची खेळी केली. गेलनं आपल्या अर्धशतकीय खेळीत 8 चौकार आणि 5 षटकार लगावले. त्याचा स्ट्राईक रेट 179 होता. या सामन्यात वेस्ट इंडिजनं टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात सलामीला आलेल्या गेल आणि एविन लुईस यांनी धिमी सुरुवात केली. मात्र नंतर आक्रमक फलंदाजी करत केवळ 30 चेंडूत गेलनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं. गेलचे हे एकदिवसीय क्रिकेटमधले 54वे अर्धशतक होते.

9 वर्षांनी केली अर्धशतकी खेळी

गेलसाठी ही अर्धशतकीय खेळी खुप खास होती. कारण गेलनं भारताविरोधात विशेष आक्रमक खेळी केलेली नाही. गेलनं तब्बल 9 वर्षांनी भारताविरोधात अर्धशतकीय खेळी केली आहे. 2009मध्ये गेलनं शेवटचे अर्धशतक लगावले होते. 12व्या ओव्हरमध्ये विराटनं कॅच घेत गेलला बाद केले.

गेल आणि लुईस यांची शतकी खेळी

सलामीवीर गेल आणि लुईस यांनी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 65 चेंडूत 115 धावांची भागिदारी केली. वेस्ट इंडिजकडून 2014नंतर पहिल्यांदा घरच्या मैदानावर शतकी भागिदारी केली आहे. लुईसनं 29 चेंडूत 43 धावा केल्या, चहलनं त्याला बाद केले. दरम्यान लुईस आणि गेल यांनी पहिल्या 4 ओव्हरमध्ये केवळ 13 धावा केल्या होत्या.

गेलच्या नावावर अनोखे रेकॉर्ड

1. ख्रिस गेल पहिला खेळाडू आहे, ज्यानं क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक लगावले आहे. गेलनं टी-20, एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये ही शतकी खेळी करण्याची कामगिरी केली आहे.

2.ख्रिस गेल हा एकमेव असा खेळाडू आहे, ज्यानं कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक, एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक आणि टी-20मध्ये शतक लगावले आहे.

3.गेलनं आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप, आयसीसी टी-20 वर्ल्ड कप, आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप, चॅम्पियन ट्रॉफी आणि आयसीसी क्वालिफायर सामन्यातही शतक लगावले आहे.

4.गेलच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद आहे. गेलनं टेस्ट आणि टी-20 क्रिकेटमध्ये सलामीला येत शेवटपर्यंत नाबाद राहण्याची कामगिरी केली आहे.

दौंड : कुरकुंभ MIDC मध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

Published by: Suraj Yadav
First published: August 15, 2019, 11:03 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading