• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • ख्रिस गेलच्या चाहत्यांसाठी Good News, वेस्ट इंडिजमधून आली मोठी बातमी!

ख्रिस गेलच्या चाहत्यांसाठी Good News, वेस्ट इंडिजमधून आली मोठी बातमी!

भारतामध्ये यावर्षी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपची तयारी वेस्ट इंडिजनं सुरू केली आहे. या तयारीचा भाग म्हणून मागील टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या या टीममध्ये ‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेलचा (Chris Gayle) समावेश करण्यात आला आहे.

 • Share this:
  मुंबई, 27 फेब्रुवारी : भारतामध्ये यावर्षी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपची तयारी वेस्ट इंडिजनं सुरू केली आहे. या तयारीचा भाग म्हणून मागील टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या या टीममध्ये ‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेलचा (Chris Gayle) समावेश करण्यात आला आहे. गेलनं वयाच्या 41 व्या वर्षी 18 महिन्यानंतर टीममध्ये पुनरागमन केलं आहे. वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन असलेल्या गेलंनं 2019 साली इंग्लंड विरुद्ध शेवटची टी-20 मॅच खेळली होती. त्या मॅचमध्ये त्याने चार बॉलमध्ये फक्त पाच रन केले होते. त्यानंतर त्याला टीममधून वगळण्यात आलं. मागील अठरा महिन्यांमध्ये गेलनं वेगवेगळ्या टी-20 लीगमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. या स्पर्धेत त्याने अनेक अर्धशतकं आणि शतकं झळकावली आहेत. गेलनं 2006 साली न्यूझीलंड विरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने 58 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये 32 च्या सरासरीनं आणि 142 च्या स्ट्राईक रेटनं 1627 रन केले आहेत. यामध्ये दोन शतक आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. ( वाचा : टीम इंडियाला धक्का, मोठ्या खेळाडूची चौथ्या टेस्टमधून माघार ) श्रीलंकेविरुद्ध तीन मार्च ते सात मार्च या दरम्यान तीन मॅचची टी-20 मालिका होणार आहे. कायरन पोलार्ड (Kieron Pollard) या टीमचा कर्णधार आहे. तर निकोलस पुरन (Nicholas Pooran) हा उपकर्णधार आहे. यावर्षी होणारा टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी ही स्पर्धा वेस्ट इंडिजसाठी महत्त्वाची आहे. या टीममध्ये अनेक जुन्या खेळाडूंचं पुनरागमन झालं आहे. फास्ट बॉलर फिडेल एडवर्डसचा तर तब्बल 9 वर्षांनी टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. एडवर्सनं 2012 साली शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती. वेस्ट इंडिजची टी-20 टीम : कायरन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फेबियन एलन, ड्वेन ब्राव्हो, फिडेल एडवर्डस, ख्रिस गेल, जेसन होल्डर, एव्हिन लुईस, ओबेद मॅककॉय, रोवमॅन पॉवेल, लेंडल सिमन्स, केव्हिन सिनक्लेयर
  Published by:News18 Desk
  First published: