'टीम इंडियातील चौथ्या क्रमांकाची कमतरता मी भरून काढेन', कसोटी क्रिकेटपटूचा दावा!

'टीम इंडियातील चौथ्या क्रमांकाची कमतरता मी भरून काढेन', कसोटी क्रिकेटपटूचा दावा!

भारतीय संघात मधल्या फळीत विशेषत: चौथ्या क्रमांकावर कोण? हा प्रश्न डोकेदुखी बनला आहे.

  • Share this:

मुंबई, 16 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारताला सेमीफायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं. वर्ल्ड कपच्या आधीपासून ते वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतरही भारताच्या मधल्या फळीचा प्रश्न कायम आहे. विशेषत: चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हे कोडं अद्याप सुटलं नाही.

वर्ल्ड कपमध्ये सुरुवातील केएल राहुल चौथ्या क्रमांकावर खेळला. मात्र, शिखर धवन स्पर्धेतून बाहेर झाल्यानं त्याला सलामीला खेळावं लागलं. त्यानंतर विजय शंकर, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर खेळले. यांच्यापैकी कोणालाच चौथ्या क्रमांकावर अपेक्षित खेळी करता आली नाही. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनीसुद्धा चौथ्या क्रमांकाची कमतरता स्पर्धेनंतर बोलून दाखवली होती.

आता यासाठी भारताचा कसोटी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने म्हटलं आहे की, जर त्याला एकदिवसीय संघात संधी मिळाली तर तो चौथ्या नंबरवर खेळू शकतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगली आहे तसेच कसोटीतही त्याचा खेळ उंचावला आहे. जर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला खेळता आलं तर नक्कीच स्वत:ला सिद्ध करेन.

चेतेश्वर पुजारा म्हणाला की, संघात निवड होणं त्याच्या हातात नाही. मात्र, फलंदाज म्हणून तिनही प्रकारात खेळायची इच्छा आहे. कसोटी खेळत असून संघाची ब्ल्यू जर्सी घालण्याची इच्छा आहे. पुजाराचे लक्ष आता वेस्ट इंडिज दौरा आणि कसोटी चॅम्पियनशिपवर आहे. त्याने म्हटलं की, या दौऱ्यासाठी सध्या जोरदार सराव सुरू आहे. वेगवान खेळपट्ट्यांचा सराव करत आहे.

26 व्या वर्षी कारकिर्द संपली तरी इंग्लंडला मिळवून दिलं विजेतेपद!

'परिस्थिती खूपच कठीण, आपण नंतर बोलू'; ICC चा Wimbledon ला रिप्लाय

मुख्यमंत्रिपदावरून युतीत वादाची ठिणगी; नाशिकमध्ये शिवसेनेकडून पोस्टरबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 10:46 AM IST

ताज्या बातम्या