झगमगाटापासून लांब चेतेश्वर पुजारा चाहत्यांना म्हणतोय 'थॅंक्स', कारण...

झगमगाटापासून लांब चेतेश्वर पुजारा चाहत्यांना म्हणतोय 'थॅंक्स', कारण...

आयपीएल (IPL 2020)च्या झगमगाटामध्ये सध्या भारताचे सगळेच स्टार क्रिकेटपटू चमकाताना दिसत आहेत. पण या सगळ्यापासून भारताचा आणखी एक स्टार खेळाडू लांब आहे. कायमच प्रकाशझोतापासून लांब असलेल्या चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 वर्ष पूर्ण केली आहेत.

  • Share this:

मुंबई, 10 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या झगमगाटामध्ये सध्या भारताचे सगळेच स्टार क्रिकेटपटू चमकाताना दिसत आहेत. पण या सगळ्यापासून भारताचा आणखी एक स्टार खेळाडू लांब आहे. कायमच प्रकाशझोतापासून लांब असलेल्या चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 वर्ष पूर्ण केली आहेत. याबद्दल त्याने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. या सगळ्या वर्षांमध्ये तुम्ही केलेल्या प्रेमाबद्दल आणि सहकार्याबद्दल मी आभारी आहे, असं चेतेश्वर पुजारा म्हणाला आहे.

2010 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध बैंगलोर टेस्टमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत पुजाराने पहिल्यांदाच बॅटिंग करत दुसऱ्या इनिंगमध्ये 72 रन केले. पुजाराच्या या खेळीमुळे भारताने 207 रनचं आव्हान पार करत, हा सामना जिंकला.

32 वर्षांच्या चेतेश्वर पुजाराच्या कारकिर्दीतला उच्चांक 2018 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आला. पुजाराने या दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमध्ये 500 पेक्षा जास्त रन केले. पुजाराच्या या कामगिरीमुळे भारताने 71 वर्षानंतर ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सीरिज जिंकली. या सीरिजमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव केला होता.

'10 वर्ष भारतासाठी क्रिकेट खेळल्याचा आनंद आहे. कित्येक वर्षांपूर्वी वडिलांच्या देखरेखीत राजकोटमध्ये क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. या प्रवासाचा मी कधी विचारही केला नव्हता. तुमच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. टीमसाठी आणखी देण्याचा प्रयत्न करु,' असं ट्विट पुजाराने केलं आहे. चेतेश्वर पुजाराने 77 टेस्टमध्ये 18 शतकांसह 5,840 रन केले आहेत.

Published by: Shreyas
First published: October 10, 2020, 10:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या