मोहम्मद शम्मीला अटक होणार? टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर

जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये टीम इंडिया मालिका खेळण्यासाठी जाणार आहे

News18 Lokmat | Updated On: Nov 15, 2018 01:10 PM IST

मोहम्मद शम्मीला अटक होणार? टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर

भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला कोलकाताच्या न्यायालयाने १५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

शमीच्या पत्नीने चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी मोहम्मद विरुद्ध तक्रार नोंदवली होती. शमी आणि त्याच्या पत्नीमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत.

अलीपुर येथील न्यायिक दंडाधिकारी मोहम्मद जफर परवेज म्हणाले की, जर शमी न्यायालयात हजर राहिला नाही तर त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट काढला जाऊ शकतो.

Loading...

शमीची पत्नी हसीन जहांने शमीविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. शमीने हसीनला पैसे देण्याचे थांबवल होते. याविरुद्धच तिने पोलिसांत तक्रार केली होती. न्यायिक दंडाधिकाऱ्यांनी बुधवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

कारण ऑक्टोबरमध्ये झालेल्या सुनावणीवेळीही मोहम्मद गैरहजर होता. बुधवारीही शम्मी न्यायालयात गेला नाही. अखेर दंडाधिकाऱ्यांनी १५ जानेवारीला मोहम्मद न्यायालयात हजर राहीला नाही तर त्याला अटक करण्याचे आदेश देण्यात येतील असा समन्स दिला.

शम्मीचे वकील एसके सलीम हरमानने न्यायिक दंडाधिकारी परवेज यांच्यासमोर अपील करत शम्मीला वकिलांमार्फत उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती केली आहे.

मात्र न्यायाधिशांनी न्यायव्यवस्था सर्वांसाठी सारखी असल्याचे सांगत त्याला १६ जानेवारी २०१९ ला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले.

ज्यावेळी शमीला न्यायालयात हजर राहायचे आहे तेव्हा तो न्युझीलँडच्या दौऱ्यावर असेल. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये टीम इंडिया मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे शम्मी तेव्हा भारतात येईल की नाही याबद्दल शंकाच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2018 11:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...