• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी CSK आघाडीवर, विराटपाठोपाठ धोनीची टीम करतेय मोठी मदत

कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी CSK आघाडीवर, विराटपाठोपाठ धोनीची टीम करतेय मोठी मदत

कोरोना (Cobid-19) विरुद्धच्या लढाईत मदत करण्यासाठी क्रिकेट विश्व पुढे आलं आहे. चेन्नई सुपर किंग्सनं एका स्वयंसेवी संस्थेच्या (NGO) मदतीनं 450 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स (oxygen concentrator) दान केले आहेत.

 • Share this:
  चेन्नई, 9 मे : कोरोना (Cobid-19) विरुद्धच्या लढाईत मदत करण्यासाठी क्रिकेट विश्व पुढे आलं आहे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, शिखर धवन, अजिंक्य रहाणे या भारतीय क्रिकेटपटूंनी  यासाठी मदत जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर पॅट कमिन्स आणि ब्रेट ली यांनीही भारताला या आपत्तीचा सामना करण्यासाठी योगदान दिलंय. खेळांडूप्रमाणे आयपीएल टीम देखील या लढाईत हातभार लावत आहेत. पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स यांनी यापूर्वीच मदत जाहीर केली आहे. आता या यादीत चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) देखील समावेश झाला आहे. या आयपीएल फ्रँचायझीनं तामिळनाडूतील कोरोनाग्रस्तांना मदत केली आहे. चेन्नई सुपर किंग्सनं एका स्वयंसेवी संस्थेच्या (NGO) मदतीनं 450 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स (oxygen concentrator) दान केले आहेत. सीएसके क्रिकेट अकादमीचे संचालक आर. श्रीनिवास यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांची भेट घेतली आणि हे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स  त्यांच्याकडं सोपवले. तामिळनाडू क्रिकेट संघटनेच्या अध्यक्ष रुपा गुरुनाथ देखील यावेळी उपस्थित होत्या. आयपीएलमधील बायो-बबलमध्ये असलेल्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानं ही स्पर्धा स्थगित करावी लागली. या आयपीएल सिझनमधील 60 पैकी 29 सामने झाले असून अजून 31 बाकी आहेत. उर्वरित सामने खेळवण्यासाठी युएई, इंग्लंड आणि श्रीलंका या देशांचा प्रस्ताव आहे. यावर्षी हे सामने न झाल्यास बीसीसीआयला (BCCI) जवळपास 2500 कोटींचं नुकसान होणार आहे. Tokyo Olympic वर कोरोनाचं सावट; स्पर्धा आयोजनावर प्रश्नचिन्ह कायम विरुष्काच्या आवाहनला तुफान प्रतिसाद भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) पुढे आले. कोरोनाशी लढण्यासाठी विराट आणि अनुष्का यांनी त्यांच्या चाहत्यांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं.  विराट आणि अनुष्काने सात दिवसांच्या या मोहिमेत 7 कोटी रुपये जमवण्याचं लक्ष्य आहे. त्यांना पहिल्याच दिवशी 3.6 कोटी रुपये जमा करण्यात यश आलं आहे. विराटनं स्वत: याबाबतची माहिती दिली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: