मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

महेंद्रसिंह धोनी बनला पूर्णवेळ शेतकरी, वाचा काय आहे पुढची योजना!

महेंद्रसिंह धोनी बनला पूर्णवेळ शेतकरी, वाचा काय आहे पुढची योजना!

टीम इंडियाचा (Team India) माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni)  पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) चेन्नई सुपर किंग्सची (CSK) कॅप्टनसी करणार आहे. या आयपीएलपूर्वी तो क्रिकेट प्रॅक्टीसमध्ये नाही तर अन्य कामांमध्ये व्यस्त आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
मुंबई, 25 जानेवारी : टीम इंडियाचा (Team India) माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni)  पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) चेन्नई सुपर किंग्सची (CSK) कॅप्टनसी करणार आहे. पण आयपीएलपूर्वी तो क्रिकेट प्रॅक्टीसमध्ये नाही तर अन्य कामांमध्ये व्यस्त आहे. इंटरनॅशनल क्रिकेटला रामराम केल्यानंतर धोनी आता ऑरगॅनिक शेतीकडे (Organic Farming) वळला आहे.  लवकरच  या क्षेत्रातही नवी भरारी घेण्याची धोनीची योजना आहे. महेंद्रसिंह धोनीचं रांचीमध्ये 43 एकर फार्म हाऊस आहे. गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी धोनी रिटायर झाला. त्यानंतर त्याने या फार्म हाऊसमधील शेतीमध्ये स्वत:ला वाहून दिलं आहे. या ठिकाणी तो स्ट्रॉबेरी, टोमॅटो, कोबी, पपई याची शेती करतो.
शेतीशिवाय धोनीने पशूपालन देखील सुरु केलं आहे. ‘इनसाईड स्पोर्ट्स’ नं दिलेल्या माहितीनुसार या फार्म हाऊसमध्ये 75 गायींचा सांभाळ केला जातो. त्याचबरोबर कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन देखील केले जाते. सध्या धोनी आपल्या शेतात भाजी आणि फळ लागवड करत आहे. स्थानिक बाजारेपेठेसह युएईसारख्या देशातही त्याच्या शेतामधील भाज्यांची निर्यात करण्याची धोनीची योजना आहे. धोनीच्या फार्म हाऊसमधील ऑरगॅनिक भाज्यांची जबाबदारी झारखंड सरकारच्या कृषी विभागानं घेतली आहे.
First published:

Tags: MS Dhoni

पुढील बातम्या