मुंबई, 21 जुलै: क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ (gentleman's game) म्हणून ओळखला जातो. मात्र काही वेळा खेळाडूंनी त्यांच्या वागणुकीतून या खेळाच्या प्रतिमेला डाग लावला आहे. पाकिस्तानच्या नागरिकांच्या मदतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या चॅरिटी मॅचमध्ये (Charity cricket match) देखील हा प्रकार घडला. या मॅचमध्ये खेळाडूंनी मैदानात सर्व मर्यादा पार करत एकमेकांना मारहाण सुरु केली. ही मारहाण इतकी वाढली की, अखेर सामना रद्द करावा लागला.
इंग्लंडमधील केंटमध्ये मेडस्टोन पार्क क्रिकेट क्लबच्या मैदानात हा सर्व प्रकार घडला. या मॅचमधील प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यावेळी काही खेळाडूंमध्ये मैदानात वाद सुरू झाला. त्यानंतर त्यांनी बॅटनं एकमेकांना मारहाण केली. खेळाडूंमधील भांडण सोडवण्यासाठी प्रेक्षकातील काही महिलांनी मैदानात धाव घेतली. त्यांनी मोठ्या प्रयत्नानं या खेळाडूंना एकमेकांपासून दूर नेले. या मारहाणीचा भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) झाला आहे.
A charity cricket match was abandoned after a fight that saw players striking each other with bats broke out between two teams. pic.twitter.com/NcPGRmYA8s
— msc media (@mscmedia2) July 20, 2021
टीम इंडियाचा विजयानंतर जल्लोष, हॉटेलमध्ये रंगली गाण्यांची मैफील! VIDEO
पाकिस्तानमधील अडचणीत सापडलेल्या नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी पैसे गोळा करण्यासाठी ही मॅच आयोजित करण्यात आली होती. चांगल्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या मॅचमध्ये खेळाडूंनी एकमेकांना मारहाण केली. या मारहाणीत काही जण जखमी देखील झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.