Home /News /sport /

IPL 2021 स्थगित झाल्यानंतर कायरन पोलार्डला मिळाली Good News

IPL 2021 स्थगित झाल्यानंतर कायरन पोलार्डला मिळाली Good News

कायरन पोलार्ड (Kieron Pollard) कॅरिबेयन प्रीमियर लीगच्या या सिझनमध्ये (Caribbean Premier League 2021) ट्रिनबागो नाईट रायडर्स (TKR) या टीमचं नेतृत्त्व करणार आहे

    मुंबई, 7 मे: आयपीएल 2021 (IPL 2021) ही स्पर्धा कोरोना व्हायरसमुळे अचानक स्थगित झाली. त्यामुळे आता सर्व खेळाडू घरी परतत आहे. स्पर्धा अचानक स्थगित झाल्यानं या खेळाडूंनी त्यांचा खेळ पूर्ण दाखवण्याची संधी मिळाली नाही. मुंबई इंडियन्सचा कायरन पोलार्ड (Kieron Pollard) देखील चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध आक्रमक अर्धशतक झळकावून फॉर्मात आला होता. मात्र त्यानंतर अचानक आयपीएल स्थगित झाली. पोलार्डचा आयपीएलमधील खेळ पाहण्यास आता प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे नाराज झालेल्या पोलार्डच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. पोलार्ड कॅरिबेयन प्रीमियर लीगच्या या सिझनमध्ये  (Caribbean Premier League 2021) ट्रिनबागो नाईट रायडर्स (TKR) या टीमचं नेतृत्त्व करणार आहे. पोलार्डच्या नेतृत्त्वाखाली या टीमनं मागील सिझनमध्ये अजिंक्यपद पटकावलं होतं. या टीमसमोर गेल्या वर्षीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचं आव्हान आहे. सीपीएलचा हा सिझन 28 ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. या सिझनमधील सर्व सामने सेंट किंट्समधील वॉर्नर पार्कमध्ये होणार आहेत.  IPL 2021 स्थगित होताच अँकर झाली निवांत, नवऱ्याला लावलं कामाला... पोलार्डनं 2020 मध्ये झालेल्या सीपीएल स्पर्धेत जोरदार कामगिरी केली होती. त्यानं 11 मॅचमध्ये 51.75 च्या सरासरीनं 207 रन केले होते. यामध्ये एका अर्धशतकाचाही समावेश आहे. पोलार्ड मुंबई इंडियन्सचा (MI) अनुभवी सदस्य असून मागील सिझनमध्ये त्यानं रोहित शर्माच्या (Rohit Sharma)अनुपस्थितीमध्ये टीमचं नेतृत्व देखील केलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Kieron pollard, Mumbai Indians, West indies

    पुढील बातम्या