युवराजला डबल दणका, 238 धावा करूनही संघ स्पर्धेतून बाहेर

युवराजला डबल दणका, 238 धावा करूनही संघ स्पर्धेतून बाहेर

कॅनड़ातील ग्लोबल टी 20 स्पर्धेत युवराज सिंगच्या संघाला बाद फेरीतून बाहेर पडावं लागलं.

  • Share this:

ओटावा, 09 ऑगस्ट : कॅनडात सुरू असलेल्या ग्लोबल टी 20 स्पर्धेत युवराज सिंगच्या संघाला 238 धावा केल्यानंतरही पराभव पत्करावा लागला. टोरांटो नॅशनल्सनं विन्निपेग हॉक्सविरुद्धच्या सामन्यात 20 षटकांत 5 बाद 238 धावा केल्या होत्या. यात हेनरिक क्लासननं 49 चेंडूत 106 धावांचा पाऊस पाडला होता. त्यानंतरही टोरांटोचा दोन धावांनी पराभव झाला.

खराब प्रकाशामुळं सामना कमी षटकांचा खेळवण्यात आला. विन्निपेगनं डकवर्थ लुईस नियमानुसार दिलेलं आव्हान पूर्ण केलं. जे पी ड्युमिनीच्या फटकेबाजीच्या जोरावर 5 बाद 201 धावा केल्या होत्या. ड्युमिनीनं 41 चेंडूत 85 धावा केल्या.

टोरंटोच्या क्लासनची शतकी खेळी व्यर्थ गेली. त्यानं नाबाद 106 धावा काढताना 11 चौकार आणि 5 षटकार मारले होते. त्याच्याशिवाय थॉमसनं 73 धावा केल्या होत्या. तर याआधीच्या सामन्याप्रमाणे युवराज पुन्हा रिटायर्ड हर्ट झाला. त्यानं 7 चेंडूत 8 धावा केल्या. या सामन्यात युवराजला खेळता आलं नाही आणि सामना गमावल्यानं स्पर्धेतून बाहेरही पडावं लागलं.

विन्निपेगकडून खेळणाऱ्या जे पी ड्युमिनीनं सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यानं संघाची पडझड थांबवत विजय मिळवून दिला. विन्निपेगनं 49 धावांत 3 गडी गमावले होते त्यावेळी संघावर पराभवाचं सावट होतं. जेपी ड्युमिनीनं सन्नी सोहेल आणि कर्णधार रयाद यांना साथीला घेत विजय मिळवून दिला.

माय लेकराला भांड्यात बसवून तरुणांनी वाचवलं, पाहा हा VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: August 9, 2019, 2:45 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading