Home /News /sport /

'हा' खेळाडू लवकरच IPL आणि भारतीय टीमचा कॅप्टन होईल, कोचचा मोठा दावा

'हा' खेळाडू लवकरच IPL आणि भारतीय टीमचा कॅप्टन होईल, कोचचा मोठा दावा

टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील एक तरुण खेळाडू लवकरच आयपीएल आणि टीम इंडियाचा कॅप्टन होईल असा दावा केकेआरचा कोच ब्रँडन मॅकलम (Brendon Mccullum) याने केला आहे.

    मुंबई, 13 जून : टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय क्रिकेट टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final) आणि इंग्लंड विरुद्ध पाच टेस्ट (India vs England) खेळणार आहे. या दौऱ्यासाठी इंग्लंडमध्ये असलेला तरुण खेळाडू लवकरच आयपीएल आणि कदाचित टीम इंडियाचाही कॅप्टन होईल, असा दावा कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) कोच ब्रँडन मॅकलम (Brendon Mccullum) याने केला आहे. मॅकलमनं 'क्रिकबझ'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये टीम इंडियाचा तरुण खेळाडू शुभमन गिल  (Shubman Gill) बाबत हे भाकित केलं आहे. गिलंकडे मोठी क्षमता आहे. तो या दोन्ही टीमचं नेतृत्त्व करु शकतो, असा दावा मॅकलमनं केला आहे. गिल आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू आहे. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) स्थगित होण्यापूर्वी गिलनं 7 मॅचमध्ये 18. 85 च्या सरासरीनं 132 रन काढले आहे. केकेआरचा बॅट्समन म्हणून गिल लवकरच स्वत: ला सिद्ध करेल, असा दावा मॅकलमनं केला आहे. गिल लवकरच सुपरस्टार होईल. मी त्याला याबाबत मदत करु शकतो, असे त्याने सांगितले. आक्रमक बॅट्समन म्हणून ओळख असलेल्या न्यूझीलंडच्या माजी कॅप्टनने पुढे म्हणाला की, "गिलला  फटकेबाजी मी शिकवू शकत नाही. तो माझ्यापेक्षा चांगला हिटर आहे. माझ्या मते तो आगामी एक ते दोन वर्षात भारताचा सर्वात चांगला टी 20 खेळाडू होईल. न्यूझीलंडच्या अनुभवी बॅट्समननं विराटला टाकलं मागं, टीम इंडियाला इशारा शुभमन गिलला वर्ल्ड टेस्टच्या सीरिजच्या फायनलमध्ये संधी मिळणार का? हा प्रश्न आहे. याचे कारण म्हणजे इंग्लंड विरुद्धची मालिका आणि त्यानंतर झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या पूर्वीर्धात गिल फॉर्मात नव्हता. गिलची टीम इंडियामधील जागेसाठी मयंक अग्रवालशी स्पर्धा आहे. नॉटींगहममध्ये झालेल्या  इन्ट्रा स्क्वॅड मॅचमध्ये गिलनं चांगली बॅटींग केली. या मॅचमध्ये त्याने 135 बॉलमध्ये 85 रन काढले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, KKR, Team india

    पुढील बातम्या