Home /News /sport /

बॉलरची अशी भन्नाट बॉलिंग ऍक्शन, बुमराह-मलिंगाही फेल, Video Viral

बॉलरची अशी भन्नाट बॉलिंग ऍक्शन, बुमराह-मलिंगाही फेल, Video Viral

क्रिकेटच्या मैदानात बऱ्याच वेळा बॉलर्सच्या वेगळ्याच बॉलिंग ऍक्शन (Bowling Action) बघायला मिळतात. भारताचा टॉप बॉलर जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) ऍक्शनही इतरांच्या तुलनेत वेगळी आहे.

    मुंबई, 7 जून : क्रिकेटच्या मैदानात बऱ्याच वेळा बॉलर्सच्या वेगळ्याच बॉलिंग ऍक्शन (Bowling Action) बघायला मिळतात. भारताचा टॉप बॉलर जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) ऍक्शनही इतरांच्या तुलनेत वेगळी आहे. लसिथ मलिंगाने (Lasith Malinga) जेव्हा त्याच्या करियरला सुरूवात केली तेव्हा त्याच्या बॉलिंग ऍक्शनने अनेकांना अचंबित केलं. सध्या अशाच वेगळ्या बॉलिंग ऍक्शन असलेल्या बॉलरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही बॉलिंग ऍक्शन बघून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. ट्विटरवर एका यूजरने या बॉलरचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा बॉलर रनअप पासूनच हात हलवायला सुरूवात करतो आणि क्रीजपर्यंत आल्यानंतर बॉल टाकतो. मलिंगा, बुमराह पथिरानाला विसरून जा, ही सगळ्यात बेस्ट बॉलिंग ऍक्शन आहे, असं कॅप्शन यूजरने या व्हिडिओला दिलं आहे. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला, की इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही शेअर केला. ही प्रॉपर ऍक्शन आहे, असं म्हणत वॉनने हा व्हिडिओ रिट्विट केला. बॉलरची ही बॉलिंग ऍक्शन बघून अनेकांना लगान चित्रपटाची आठवण झाली. लगानमध्ये गोली नावाचं कॅरेक्टरही अशाच प्रकारे रन अप पासूनच हात हलवत बॉलिंग करतो. आयपीएल 2022 मध्ये सीएसकेकडून खेळलेला मथिशा पथिराना याची बॉलिंग ऍक्शन मलिंगासारखीच आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर पॉल ऍडम्स त्याच्या बॉलिंग ऍक्शनमुळे चर्चेत आला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या