अविश्वसनीय! कॅच पकडण्यासाठी तो 100 मीटर धावला, VIDEO VIRAL
अविश्वसनीय! कॅच पकडण्यासाठी तो 100 मीटर धावला, VIDEO VIRAL
टी-20 क्रिकेटचा उदय झाल्यामुळे फिल्डिंगला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे, त्यामुळे आता क्रिकेटमध्ये अनेक भन्नाट कॅच पहायला मिळत आहेत. अशाच एका अफलातून कॅचचा VIDEO सोशल मीडियावर VIRAL झाला आहे,
मुंबई, 9 ऑक्टोबर : गल्ली क्रिकेट असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट, प्रत्येक ठिकाणी खेळावर प्रेम असणारा खेळाडू स्वत:ला झोकून देतो. बॅटिंग आणि बॉलिंगप्रमाणेच फिल्डिंगही अनेकवेळा टीमना मॅच जिंकवून देते, त्यामुळे हल्ली फिल्डिंगलाही बॅटिंग आणि बॉलिंगएवढंच महत्त्व प्राप्त झालं आहे. टी-20 क्रिकेटमध्ये तर एखादा कॅचही संपूर्ण मॅच पलटवू शकतो. असाच एक जबरदस्त कॅच सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
30 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये बॉलर कॅच पकडण्यासाठी जवळपास 100 मीटर धावला आहे. बॉलरचा कॅच पकडतानाचा असा व्हिडिओ तुम्ही यापुर्वी कदाचित बघितलाही नसेल. श्रीलंकेतल्या आर्मी कमांडर टी-20 मॅचमध्ये बॉलरने हा कॅच पकडला आहे. बॅट्समनने बॉलला मिड विकेटच्या दिशेने हवेत मारलं. यानंतर दोन फिल्डर डीप मीड विकेटच्या दिशेने कॅच घेण्यासाठी पळाले, पण बॉलरने स्वत: जाऊन हा कॅच पकडला.
"Is he a sprinter or cricketer?"
This could be the greatest caught and bowled EVER! pic.twitter.com/rC3fwmbmnz
ही मॅच प्राईम स्टेला इर्स्टर्न वॉरियर्स आणि सुपर फॅशन नॉर्दन वॉरियर्स यांच्यात झाली. फास्ट बॉलर थेनु रतनने हा अफलातून कॅच पकडला. तर आऊट होणारा बॅट्समन होता आशन रणदिका. 8 रन करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.