गोलंदाजांने चेंडू टाकल्यानंतर केला 'असा' खेळ, फलंदाजही झाला हैराण; पाहा VIDEO

गोलंदाजांने चेंडू टाकल्यानंतर केला 'असा' खेळ, फलंदाजही झाला हैराण; पाहा VIDEO

सोशल मीडियावर सध्या क्रिकेटच्या मैदानातील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

• Share this:

मुंबई, 20 मार्च : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. क्रिकेटच्या मैदानावर अनेक खेळाडू आश्चर्यकारक खेळ करतात. मात्र आता एका गोलंदाजाने चेंडू टाकल्यानंतर दाखवलेलं कौशल्य चर्चेत आलं आहे. गोलंदाज असलेल्या या क्रिकेटपटूने आपण चांगला फुटबॉलपटूही असल्याचं दाखवून दिलं आहे. त्यानं फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोसारखंच बॉलसोबत जगलिंग केलं.

गोलंदाजाचं हे कौशल्य दाखवणारा व्हिडिओ भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने शेअर केला आहे. गोलंदाज रनअप घेतल्यानंतर चेंडू टाकतो. त्यानंतर फलंदाजाने चेंडू न टोलावता सावध फटका  मारला. तेव्हा चेंडू गोलंदाजाच्या दिशेने आला. गोलंदाजाने हातानं चेंडू न उचलता तो जगलिंग करू लागला. त्याचं जगलिंग पाहून फलंदाज हैराण झाला.

Bowler hai ya CR7 ☺️😝 #AakashVani pic.twitter.com/edgwnhXEzm
— Aakash Chopra (@cricketaakash) March 17, 2020

आकाश चोप्राने हा व्हिडिओ 17 मार्चला शेअर केला होता. आतापर्यंत 50 हजारांहून अधिकवेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे.

याशिवाय क्रिकेटच्या मैदानातले अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी जबरदस्त कॅचचे तर कधी सोपे कॅच सोडलेले. असाच एक वाईट फिल्डिंगचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. खेळाडूच्या डोळ्यासमोर चेंडू असून, त्याला दिसला नाही. हा प्रकार घडला पाकिस्तान सुपर लीग य स्पर्धेत.

pic.twitter.com/hMHENX9FQC
— venu_gopal_rao_fans (@CricketVideos16) March 15, 2020

एकीकडे कोरोनामुळे सर्व क्रिकेट सामने रद्द झाले असले तरी, पाकिस्तान सुपर लीग मात्र सुरू आहे. या स्पर्धेच्या 28व्या सामन्यात इस्लामाबाद युनायटेडचा वेगवान गोलंदाज अकिफ जावेदने आपल्या क्षेत्ररक्षणात बालिश चूक केली. कराची किंग्सच्या डावाच्या सातव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर फलंदाज इमाद वसीमने एक धाव काढण्याचा प्रयत्न केला. त्याने थर्ड़ लेगला असलेल्या अकिफ जावेदकडे चेंडू मारला. अकिफने बॉल पकडण्याचा प्रयत्न केला पण चेंडू त्याच्या पायाखालून गेला. जावेदनं चेंडू अडवण्याआधीच चौकार गेला. यामुळे कराची किंग्जला 1 धावाच्या बदल्यात 4 धावा मिळाल्या. या सामन्यात कराची किंग्जने इस्लामाबाद युनायटेडचा 4 गडी राखून पराभव केला.

हे वाचा :...आणि चहलने उगारला मुलीवर हात, पाहा हा VIRAL VIDEO

First published: March 20, 2020, 8:46 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या