भावाला झाली कोरोनाची लागण, BCCI कडून 2 वर्षांपासून पैसे न मिळाल्यानं खेळाडू हतबल

भावाला झाली कोरोनाची लागण, BCCI कडून 2 वर्षांपासून पैसे न मिळाल्यानं खेळाडू हतबल

बीसीसीआयनं (BCCI) त्यांच्या खेळाडूंच्या वार्षिक पगाराची यादी काही दिवसांपूर्वी जाहीर केली. यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंवर धनवर्षाव करण्यात आला आहे. खेळाडूंना मालामाल करणाऱ्या बीसीसीआयच्या कारभाराची एक धक्कादायक बाजू उघड झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 3 मे : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाची (BCCI) ओळख आहे. बीसीसीआयनं त्यांच्या खेळाडूंच्या वार्षिक पगाराची यादी काही दिवसांपूर्वी जाहीर केली. यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंवर धनवर्षाव करण्यात आला आहे.  खेळाडूंना मालामाल करणाऱ्या बीसीसीआयच्या कारभाराची एक धक्कादायक बाजू उघड झाली आहे. बिहारचा फास्ट बॉलर प्रशांत सिंह (Prashant Singh) या क्रिकेटपटूला बीसीसीआयनं दोन वर्षांपासून त्याचे पैसे दिलेले नाहीत.

'इंडियन एक्स्प्रेस' नं दिलेल्या वृत्तानुसार प्रशांत सिंह हा त्याच्या घरातील एकमेव कमावता सदस्य आहे. बिहारमधील छपरामध्ये राहणाऱ्या  त्याच्या मोठ्या भावाला कोरोनाची लागण झाली आहे. आईला देखील श्वास घेण्यास त्रास होत आहे, पण जवळ पैसे नसल्यानं त्यांच्यावर उपचार कसा करायचा? हा प्रश्न प्रशांतला पडला आहे.

SMS येतो तेंव्हा...

"माझ्या मोबाईलवर नवा SMS येतो त्यावेळी तो मेसेज हा बीसीसीआयकडून जमा झालेल्या पैशांचा असेल, असं मला वाटतं. मागच्या वर्षी माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं. त्या लग्नासाठी मी उधारी घेतली होती. ही उधारी मी मॅच फिसमधून परत करेल असं ठरवलं होतं. मला अजूनही पैसे मिळालेले नाहीत. माझ्या वडिलांचं  2016 साली निधन झालं. आता माझ्या मोठ्या भावाला कोरोनाची लागण झालीय.त्याच्या उपचारासाठी मी पैसे कुठून आणू ? असा प्रश्न प्रशांतनं विचारला आहे.

प्रशांतला बीसीसीआयकडून 8 लाख रुपये येणं बाकी आहे. बीसीसीआयकडून पैसे न मिळालेला प्रशांत हा एकमेव खेळाडू नाही. बिहारची 19 वर्षांच्या खालील, 23 वर्षांखालील तसेच वरिष्ठ टीमच्या खेळांडूनाही मागील 2 सिझनपासून पैसे मिळालेले नाहीत.

BCCI नं हार्दिक पांड्याच्या पगारात केली 2 कोटींची वाढ, वाचा रोहित आणि विराटला किती मिळणार पैसे?

बिहार बोर्डाचे स्पष्टीकरण काय?

बिहारमधील क्रिकेटपटूंचे व्हाऊचर जमा करण्यात झालेल्या चुकीमुळे हे पैसे मिळण्यास उशीर होत आहे, अशी माहिती बिहार क्रिकेट बोर्डाच्या (BCA) अधिकाऱ्यानं दिली आहे. हे सर्व व्हाऊचर्स मार्च महिन्यानत नव्यानं पाठवण्यात आले आहेत. बीसीसीआय या कागदपत्रांची पडताळणी करत आहे, अशी माहिती या अधिकाऱ्यानं दिली आहे.

Published by: News18 Desk
First published: May 3, 2021, 11:05 AM IST

ताज्या बातम्या